Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asus चे दोन नवीन गेमिंग स्मार्टफोन लाँच, फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळणार पावरफुल फीचर्स

Asus ROG Phone 9 आणि ROG Phone 9 Pro मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,800mAh बॅटरी देण्यात आली आहे. Asus ROG Phone 9 Pro Edition मध्ये 24GB LPDDR5X रॅम आणि 1TB UFS4.0 स्टोरेज देण्यात आलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 20, 2024 | 07:45 PM
Asus चे दोन नवीन गेमिंग स्मार्टफोन लाँच, फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळणार पावरफुल फीचर्स

Asus चे दोन नवीन गेमिंग स्मार्टफोन लाँच, फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळणार पावरफुल फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी आणि तैवानचा स्मार्टफोन ब्रँड Asus ने दोन नवीन गेमिंग स्मार्टफोन लाँच केले आहेत. Asus ROG Phone 9 Pro आणि ROG Phone 9 हे दोन्ही स्मार्टफोन मंगळवारी लाँच करण्यात आले आहेत. नवीन ROG फोन लाइनअपमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर 24GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नवीन Asus ROG Phone 9 सिरीजमध्ये IP68 रेटेड बिल्ड आणि AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. फोन प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेल सोनी लिटिया 700 सेन्सरसह लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)

किंमत

Asus ROG Phone 9 Pro स्मार्टफोनचा 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंट EUR 1,200 म्हणजेच अंदाजे 1,00,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तर Asus Phone 9 स्मार्टफोनचा 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट EUR 1,099 म्हणजेच अंदाजे 98,000 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. Asus ROG Phone 9 Pro Edition स्मार्टफोनचा 24GB + 1TB स्टोरेज व्हेरिएंट EUR 1,500 म्हणजेच अंदाजे 1,33,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे.

Asus ROG Phone 9 स्मार्टफोन फँटम ब्लॅक आणि स्टॉर्म व्हाइट फिनिश रंगात उपलब्ध आहे. तर Asus ROG Phone 9 Pro Edition आणि ROG Phone 9 Pro केवळ स्टॉर्म व्हाइट फिनिश रंगात उपलब्ध आहे.

Asus ROG Phone 9 सिरीज स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Asus ROG Phone 9 Pro आणि ROG Phone 9 हे दोन्ही स्मार्टफोन हँडसेट Android 15-आधारित ROG UI चालवतात. स्मार्टफोनमध्ये 165Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच फुल-HD+ (1,080×2,400 पिक्सेल) Samsung AMOLED LTPO डिस्प्ले देण्याात आला आहे. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 2,500nits पर्यंत आहे. त्याला स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षण देण्यात आलं आहे.

प्रोसेसर

दोन्ही स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपने सुसज्ज आहेत.

स्टोरेज

Asus ROG Phone 9 Pro Edition मध्ये 24GB LPDDR5X रॅम आणि 1TB UFS4.0 स्टोरेज आहे. तर नियमित मॉडेल आणि ROG 9 Pro मध्ये जास्तीत जास्त 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे. या फोनमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी कंपनीची इन-हाऊस ROG GameCool 9 कूलिंग सिस्टम देखील आहे.

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कॅमेरा

Asus ROG Phone 9 हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये f1/9 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल Sony Lytia 700 1/1.56-इंच सेन्सर आणि 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा आहे. त्याचप्रमाणे, ROG Phone 9 Pro मध्ये OIS आणि 3x ऑप्टिकल झूम असलेला 32-मेगापिक्सेल सेन्सर आहे. ROG Phone 9 आणि ROG Phone 9 Pro या दोन्हींमध्ये सेल्फीसाठी समोर 32-मेगापिक्सेलचा RGBW कॅमेरा आहे. कॅमेरा युनिट AI ऑब्जेक्ट सेन्स, AI हायपरक्लॅरिटी आणि AI हायपरक्लॅरिटीसह अनेक AI वैशिष्ट्यांना समर्थन देते.

बॅटरी

Asus ROG Phone 9 आणि ROG Phone 9 Pro मध्ये 5,800mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीच्या माध्यमातून फोन फक्त 46 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होऊ शकतो. दोन्ही फोनमध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68-रेटींग आहे.

 

 

Web Title: Asus rog phone 9 pro and rog phone 9 smartphone launch know specifications and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • smartphone update
  • tech launch

संबंधित बातम्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
2

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
3

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर
4

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.