Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo Reno 15 Launched: कंपनीचा मास्टरस्ट्रोक! एकाचवेळी 4 फोन लाँच, परफॉर्मन्स आणि डिझाइनसह सर्वच टॉप क्लास

Oppo Reno 15 Series: कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. सिरीजमध्ये एकाच वेळी 4 स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. प्रो मॉडेलमध्ये 6.78 इंच FHD+ डिस्प्ले, रेनो 15 च्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 09, 2026 | 10:06 AM
Oppo Reno 15 Launched: कंपनीचा मास्टरस्ट्रोक! एकाचवेळी 4 फोन लाँच, परफॉर्मन्स आणि डिझाइनसह सर्वच टॉप क्लास

Oppo Reno 15 Launched: कंपनीचा मास्टरस्ट्रोक! एकाचवेळी 4 फोन लाँच, परफॉर्मन्स आणि डिझाइनसह सर्वच टॉप क्लास

Follow Us
Close
Follow Us:
  • Oppo ची नवीन स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच
  • Reno 15 सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष
  • कॅमेरा, परफॉर्मन्स आणि डिझाइनमध्ये मोठी झेप
स्मार्टफोन कंपनी Oppo ने कंपनीची नवीन Reno 15 सीरीज भारतात लाँच केली आहे. Reno 15 सीरीज गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Reno 14 सीरीजचे अपग्रेड आहे. कंपनीने या सिरीजमध्ये चार स्मार्टफोन मॉडेल्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Reno 15, Reno 15 Pro, Reno 15 Pro Mini, Reno 15c यांचा समावेश आहे. हे स्मार्टफोन मिड रेंज किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. तसेच यामध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

OPPO Reno 15 स्मार्टफोन मॉडेल्सची किंमत

OPPO Reno 15c

OPPO Reno 15c दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन आफ्टरग्लो पिंक आणि ट्विलाइट ब्लू रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आणि 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)

OPPO Reno 15

हा स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच हे डिव्हाईस ग्लेशियर व्हाइट, अरूरा ब्लू आणि ट्विलाइट ब्लू रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. या डिव्हाईसच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 45,999 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 48,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 53,999 रुपये आहे.

OPPO Reno 15 Pro Mini

हे डिव्हाईस देखील दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. तसेच हा स्मार्टफोन ग्लेशियल व्हाइट, अरूरा ब्लू आणि ट्विलाइट ब्लू अशा कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 64,999 रुपये आहे.

OPPO Reno 15 Pro

सनराइज गोल्ड आणि कोका ब्राउन ब्लू रंगात खरेदीसाठी उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 67,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 72,999 रुपये आहे.

The #OPPOReno15Series pricing is now official:
• OPPO Reno15c 5G starting at ₹34,999
• OPPO Reno15 5G starting at ₹45,999
• OPPO Reno15 Pro Mini 5G starting at ₹59,999
• OPPO Reno15 Pro 5G starting at ₹67,999#TravelWithReno #AIPortraitCamera #LiveItYourWay pic.twitter.com/iOhxPXh6RU
— OPPO India (@OPPOIndia) January 8, 2026

Oppo Reno 15 Pro आणि Reno 15 Pro Mini चे फीचर्स

सिरीजमधील हे दोन्ही प्रो मॉडेल्स एक सारख्या फीचर्ससह लाँच करण्यात आले आहेत. प्रो मॉडेलमध्ये 6.78 इंच FHD+ डिस्प्ले आहे, तर प्रो मिनीमध्ये 6.32 इंच 1.5K रेजलूशनवाला डिस्प्ले दिला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटवाल्या AMOLED डिस्प्ले सह उपलब्ध आहेत. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 देखील आहे. दोन्ही फोन MediaTek Dimensity 8450 प्रोसेसरवर आधारित आहेत आणि यामध्ये 12GB रॅमसह 512GB स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Oppo Reno 15 Pro आणि Reno 15 Pro Mini च्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 200MP चा मुख्य OIS कॅमेरा दिला आहे. याशिवाय फोनमध्ये 50MP चा अल्ट्रा वाइड आणि 50MP चा पेरीस्कोप टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या दोन्ही फोनमध्ये 50MP चा कॅमेरा दिला आहे. Oppo Reno 15 Pro मध्ये 6,500mAh बॅटरी आणि Reno 15 Pro Mini मध्ये 6,200mAh बॅटरी दिली आहे. यामध्ये चार्जिंगसाठी 80W सुपरवूक फास्ट चार्जर आहे. दोन्ही स्मार्टफोन Android 16 वर बेस्ड ColorOS 16 वर चालतात.

Oppo Reno 15 आणि Reno 15c चे फीचर्स

ओप्पोचे हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल्स देखील प्रो मॉडेल सारख्याच डिझाईनसह लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 6.59 इंच LTPS AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. दोन्ही डिव्हाईसमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन आहे. Reno 15 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 4 चिपसेट आहे. यासोबतच हे डिव्हाईस 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसा सपोर्ट करते. Reno 15c मध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे, तसेच यामध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सपोर्ट देखील आहे.

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

रेनो 15 आणि रेनो 15c च्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा मुख्य, 50MP चा टेलीफोटो आणि 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हे स्मार्टफोन मॉडेल्स देखील Android 16 वर बेस्ड ColorOS 16 वर चालतात. Reno 15 मध्ये 6,500mAh बॅटरी आहे तर Reno 15c मध्ये 7000mAh बॅटरी दिली आहे. दोन्ही स्मार्टफोन 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: OPPO फोन भारतात बनतात का?

    Ans: हो, OPPO चे अनेक स्मार्टफोन्स भारतातच असेंबल केले जातात.

  • Que: OPPO फोनचा कॅमेरा चांगला असतो का?

    Ans: हो, OPPO फोन खासकरून कॅमेरा, AI फीचर्स आणि पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत.

  • Que: OPPO मध्ये कोणता Android OS वापरला जातो?

    Ans: OPPO फोनमध्ये Android आधारित ColorOS वापरला जातो.

Web Title: Oppo reno 15 series launched in india 4 smartphone models included in this series read features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Vivo V70 Elite vs OnePlus 15R: परफॉर्मंस की कॅमेरा? 50 हजारांत कोणता फोन ठरेल बेस्ट? जाणून घ्या
1

Vivo V70 Elite vs OnePlus 15R: परफॉर्मंस की कॅमेरा? 50 हजारांत कोणता फोन ठरेल बेस्ट? जाणून घ्या

तब्बल 7600mAh बटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट… iQOO च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, फीचर्सवर एक नजर टाका
2

तब्बल 7600mAh बटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट… iQOO च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, फीचर्सवर एक नजर टाका

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?
3

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.