फोटो सौजन्य -iStock
आपण सर्वचजण Amazon Prime Day Sale ची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. Amazon Prime Day Sale 2024 हा 20 आणि 21 जुलै रोजी होणार आहे. Prime Day Sale हा केवळ Amazon प्राइम सदस्यांसाठी आहे. Amazon Prime Day Sale मध्ये कंपनी अनेक आकर्षक डील आणि वस्तूंवर बंपर डिस्काऊंट देणार आहे. अगदी गॅजेट्स आणि घरगुती वस्तूंपासून फॅशनपर्यंतच्या सर्व गोष्टी प्राइम सदस्यांना अगदी स्वस्त किंमतीत मिळणार आहेत. सेलमध्ये स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिले जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही सुध्दा जर Amazon प्राइम सदस्य असाल, तर तुम्हालाही बंपर ऑफर्ससह मनसोक्त शॉपिंग करता येणार आहे. पण या सेलदरम्यान शॉपिंग करताना थोडी काळजी घ्या, नाहीतर तुमची एक छोटीशी चूक सुध्दा महागात पडू शकते.
चेकपॉइंट रिसर्च ने सादर केलेल्या एका अहवालानुसार, या Amazon Prime Day Sale ग्राहकांनी खरेदी करताना काळजी घ्यावी. कारण आपली एक चूक आणि आपण सायबर फ्रॉडचे शिकार होऊ शकतो. Sale दरम्यान सायबर गुन्हेगार ॲमेझॉनच्या बनावट वेबसाइट तयार करतात. ज्यामुळे अनेक युजर्सत्यांच्या बनावट वेबसाईटला भेट देतात आणि सायबर फ्रॉडचे शिकार होतात. सायबर गुन्हेगार Amazon Prime Day Sale दरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करतात. ते लोकांना भरघोस डिस्काउंट आणि मोठमोठ्या ऑफर्स दाखवून फसवतात.
आकर्षक ऑफर्स आणि भरघोस डिस्काउंटमुळे ग्राहक त्यांच्या बनावट बेवसाईटकडे आकर्षित होतात. सायबर गुन्हेगार ग्राहकांकडून माहिती गोळा करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यानंतर ग्राहकांना बनावट संदेश पाठवले जातात, ज्यामध्ये बनावट ऑफरची माहिती असते. या संदेशांमध्ये व्हायरस असलेल्या लिंक्स देखील देतात, ज्याच्या मदतीने युजर्सचे नाव, पासवर्ड आणि बँक खात्यांचे पेमेंट तपशील हॅकर्सपर्यंत पोहोचतात. अमेरिकेत लोकांसोबत अशाप्रकारे सायबर फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अमेरिकेत बनावट वेबसाइट तयार करून लोकांची फसवणूक केली आहे.
ऑनलाइन खरेदी करताना विशेष लक्ष द्या
सायबर फसवणूक टाळण्यासाठी लोकांना सतर्क राहावे लागेल. कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करताना, त्याची URL नक्कीच तपासा. नेहमी URL http सुरू होते की नाही याकडे लक्ष द्या. तुमच्या बँक खात्यासाठी एक मजबूत पासवर्ड तयार करा. खाते तपशील कोणाशीही शेअर करू नका. ईमेलमध्ये आलेल्या कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.