
Whatapp logo (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
बॅकअपमुळे मोठी डोकेदुखी होते.
काहीवेळा जुने फोटो किंवा फाईल्य स्टोरेजसाठी काढून टाकाव्या लागतात.
व्हॉट्सॲप स्वत: ची स्वतंत्र क्लाउड स्टोरेज सेवा आणणार.
आजकाल व्हॉट्सॲप (Whatapp) हा प्रत्येकाच्या आयुष्याचा जणूकाही एक भागच बनला आहे. खाजगी गप्पांपासून ते कामांच्याठिकाणी पर्यंतच्या अनेक गोष्टी या एक अॅपवर अवलंबून आहेत. त्यामुळे वर्षानुवर्ष जमा झालेल्या चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रांसाठी बॅकअपही तितकाच महत्त्वाचा ठरतो. परंतू अनेकदा हा बॅकअपच आपल्याला डोकेदुखी बनतो. गुगल ड्राइव्ह (Google Drive) किंवा iCloud मधील जागा संपल्यानंतरही अनेकदा नवीन स्टोरेज खरेदी करावे लागते. दरम्यान काही जुन्या फाईल किंवा फोटो काढून टाकण्याची वेळ येते.
मात्र आता ही अडचण लवकच कमी होऊ शकते. कारण व्हॉट्सॲप स्वत: ची स्वतंत्र क्लाउड स्टोरेज सेवा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच पुढे भविष्यात चॅटचा बॅकअप ठेवण्यासाठी गुगल ड्राइव्ह किंवा अॅपल iCloud वर पूर्णपणे अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या सुविधेची सुरुवात सर्वप्रथम आयफोन वापरकर्त्यांसाठी होण्याची शक्यत आहे. सध्या अॅपल Apple कडून मिळणारी मोफत iCloud जागा मर्यादित असल्यामुळे अनेक युजर्सना अतिरिक्त स्टोरेजसाठी दरमहा पैसे खर्च करावे लागतात. व्हॉट्सॲपची नवीन सेवा सुरु झाल्याच हा खर्च काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
सुरुवातीला प्रत्येक वापरकर्त्याला व्हॉट्सॲपकडून सुमारे 2GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळू शकते, अशी चर्चा आहे. ज्यांचा बॅकअप कमी आहे, त्यांच्यासाठी ही जागा पुरेशी ठरू शकते. मात्र, ज्यांच्याकडे हजारो फोटो, व्हिडिओ आणि मोठ्या प्रमाणात चॅट डेटा आहे, त्यांच्यासाठी कंपनी सशुल्क योजना देखील आणण्याची तयारी करत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 50GB स्टोरेजसाठी दरमहा जवळपास 80 ते 85 रुपये मोजावे लागू शकतात. याशिवाय जास्त डेटा साठवणाऱ्या वापरकर्त्यांसाठी 1TB पर्यंतची मोठी योजना देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अंतिम किंमती कंपनी अधिकृत घोषणा करताना बदलू शकतात.
WhatsApp ला केंद्र सरकारचा ब्रेक! जोपर्यंत चर्चा पूर्ण होत नाही …
या नव्या सेवेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सुरक्षा. व्हॉट्सॲप आपल्या क्लाउड बॅकअपमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन डीफॉल्ट स्वरूपात देण्याची तयारी करत आहे. म्हणजेच तुमचे चॅट्सचा बॅकअप सुरक्षित राहणार, आणि जोपर्यंत तुम्ही योग्य परवानगी देत नाही तोपर्यंत दुसरे कोणीही पाहू शकणार नाही. वापरकर्ते पासवर्ड, पासकी किंवा खास एन्क्रिप्शन कीच्या मदतीने आपला बॅकअप सुरक्षित ठेवू शकतील.
विशेष म्हणजे, गुगल ड्राइव्ह किंवा iCloud वापरण्याचा पर्याय पूर्णपणे बंद होणार नाही. ज्यांना जुनी पद्धत वापरायची आहे, ते ती सुरू ठेवू शकतील. मात्र नवीन क्लाउड सेवा हा एक अतिरिक्त पर्याय म्हणून उपलब्ध असेल. त्यामुळे प्रत्येक वापरकर्ता आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकेल.
WhatsApp Update: युजर्सची प्रतीक्षा संपली! आता चॅटिंगसाठी नंबर शेअर …
सध्या हे फीचर चाचणीच्या टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. Android आणि आयफोन या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी त्यावर काम सुरू आहे. कंपनीकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर हे फीचर टप्प्याटप्प्याने सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जर हा बदल प्रत्यक्षात आला, तर व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांना स्टोरेजची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होईल. विशेषतः ज्यांच्या फोनमध्ये कायम जागेची कमतरता भासते किंवा क्लाउड स्टोरेजसाठी वेगळे पैसे खर्च करावे लागतात, त्यांच्यासाठी ही सुविधा निश्चितच फायदेशीर ठरू शकते.