Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

boAt आणि Spotify Premium ची मोठी घोषणा! ऑडिओ जगतात ऐतिहासिक भागीदारी; ४ महिने मोफत ऐका आवडती गाणी!

ऑडिओ ब्रँड boAt ने Spotify Premium सोबत भागीदारी जाहीर केली आहे. या निवडक boAt उत्पादनांवर ४ महिन्यांचे सबस्क्रिप्शन आणि १२ आठवडे मोफत संगीत अनुभव मिळेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 05, 2026 | 06:10 PM
boAt आणि Spotify Premium ची मोठी घोषणा! ऑडिओ जगतात ऐतिहासिक भागीदारी; ४ महिने मोफत ऐका आवडती गाणी!
Follow Us
Follow Us:
  • boAt आणि Spotify Premium च्या नवीन भागीदारी अंतर्गत ग्राहकांना जाहिरातमुक्त संगीत आणि उच्च गुणवत्तेचा ऑडिओ अनुभव मिळणार आहे.
  • निवडक boAt उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चार महिन्यांचे Spotify Premium सबस्क्रिप्शन देण्यात येणार असून पहिले १२ आठवडे मोफत असतील.
  • या भागीदारीचा प्रचार करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी कलाकार ‘चार दिवारी’ यांचा समावेश असलेली ‘HALF the Experience’ मोहीम लाँच केली.

भारतातील पहिल्या क्रमांकाचा ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड असलेल्या boAt ने संपूर्ण भारतातील संगीतप्रेमींना अधिक समृद्ध आणि तल्लीन करणारा संगीताचा अनुभव देण्यासाठी आज Spotify Premium सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. boAt चे उत्कृष्ट ऑडिओ तंत्रज्ञान आणि Spotify Premium चा विनाअडथळा संगीत ऐकण्याचा अनुभव एकत्र आणणारी ही भागीदारी, संगीताचा अनुभव कोणतीही तडजोड किंवा अडथळ्याशिवाय पूर्ण स्वरूपात घेतला पाहिजे या सामायिक विश्वासावर आधारित आहे.

उत्कृष्ट हार्डवेअर आणि दर्जेदार कंटेंट यांचा सुरेख संगम असणाऱ्या अनुभवांकडे ग्राहकांचा कल वाढत असताना, संगीताच्या उत्तम आवाजासोबत त्यांच्या आवडत्या गाण्यांचा अखंड प्रवाह जोडून दैनंदिन संगीत ऐकण्याच्या अनुभवाला नवी व्याख्या देण्याचे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. पात्र boAt उत्पादनांसोबत आता चार महिन्यांचे Spotify Premium सबस्क्रिप्शन मोफत दिले जाईल, ज्यामध्ये पहिले १२ आठवडे हे पूर्णपणे मोफत असतील. यामुळे वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त संगीत, ऑफलाइन ऐकण्याची सुविधा आणि सुधारित ऑडिओ गुणवत्तेचा आनंद घेता येईल.

व्ह्यूसोनिकतर्फे इनबिल्ट ५० मेगापिक्सेल एआय कॅमेरा असलेला पहिला ‘व्ह्यूबोर्ड’ लाँच! पाहून घ्या हायटेक फीचर्स

या भागीदारीचे औचित्य साधून boAt आणि Spotify Premium ने “HALF the Experience” नावाचे एक डिजिटल मोहीम (कॅम्पेन) लाँच केले आहे. “”HALF the quality. HALF the fun. HALF the experience” या संकल्पनेवर आधारित ही मोहीम, खराब ऑडिओ गुणवत्ता, अडथळे आणि सामान्य ऑडिओ उपकरणांमुळे संगीताचा मूळ अनुभव कसा अपूर्ण राहतो, हे रंजक पद्धतीने दाखवून देते.

या मोहिमेच्या जाहिरात पटाची (कॅम्पेन फिल्म) सुरुवात एका पूर्ण भरलेल्या मैफिलीत होते, जिथे सर्वकाही अर्धवट असते. लोकप्रिय कलाकार ‘चार दिवारी’ हा ‘दो दिवारी’ बनतो, प्रेक्षकांना ‘निम्म्या टाळ्या’ वाजवण्यास सांगितले जाते आणि संगीतकार ३ तारांचे गिटार, अर्धा ड्रम संच आणि अपूर्ण वेशभूषेत सादरीकरण करतात. हे सादरीकरण लगेचच हे स्पष्ट करते की Spotify Premium शिवाय सामान्य हेडफोनवर संगीत ऐकणे म्हणजे नक्की काय: ‘निम्मा अनुभव’. त्यानंतर तो कलाकार श्रोत्याच्या इअरफोनमधून बाहेर येतो आणि म्हणतो, “असे अर्धे-कच्चे गाणे कधीपर्यंत ऐकणार? ऐकायचे असेल तर पूर्ण ऐका. आता तर boAt सोबत Spotify Premium मोफत आहे!” श्रोता जेव्हा boAt कडे वळतो, तेव्हा तो कलाकार पुन्हा मंचावर पूर्ण रूपात येतो आणि संगीताचा उच्च दर्जाचा व विनाअडथळा अनुभव सादर करतो.

प्रगत एआय तंत्रज्ञानासह सॅमसंगचे नवीन ‘गॅलेक्सी वॉच’ लवकरच होणार लॉन्च; जाणून घ्या काय असेल खास!

या भागीदारीबद्दल बोलताना *boAt च्या प्रवक्त्याने* सांगितले, “boAt मध्ये आमचा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की उत्तम संगीताला तितकाच उत्तम ऑडिओ अनुभव मिळाला पाहिजे. गेल्या काही वर्षांत आम्ही कलावंत, निर्माते आणि संगीत जगताशी अर्थपूर्ण नाते निर्माण करत उत्कृष्ट ऑडिओ तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले आहे. Spotify Premium सोबतची आमची ही भागीदारी संगीताच्या अनुभवातील दोन महत्त्वाचे घटक — तल्लीन करणारा आवाज आणि अखंड संगीत — एकत्र आणते. ‘HALF the Experience’ च्या माध्यमातून आजची युवा पिढी ज्या प्रकारे संगीताचा आनंद घेते, त्याला रंजक आणि जवळच्या वाटणाऱ्या पद्धतीने मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

तंत्रज्ञान, कंटेंट आणि संस्कृती एकत्र आणून केवळ उपकरणांपुरते मर्यादित न राहता त्यापलीकडील अनुभव निर्माण करण्यावर boAt चा सातत्याने भर राहिला आहे, ही भागीदारी त्याच प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. प्रीमियम ऑडिओ आणि जगातील एका आघाडीच्या म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला एकत्र आणून boAt आणि Spotify Premium देशभरातील संगीतप्रेमींना अधिक अखंड आणि समाधानकारक अनुभव देण्याचे उद्दिष्ट ठेवतात.

पात्र boAt ग्राहक आता निवडक उत्पादनांवर चार महिन्यांच्या Spotify Premium सबस्क्रिप्शनचा आनंद घेऊ शकतात, ज्यामध्ये पहिले १२ आठवडे मोफत असतील. ही ऑफर वापरकर्त्यांना boAt च्या पुरस्कारप्राप्त ऑडिओ उपकरणांसह जाहिरातमुक्त संगीत, ऑफलाइन सुविधा आणि उच्च दर्जाच्या ऑडिओचा अनुभव घेण्याची संधी देते.

Web Title: Boat spotify premium partnership free subscription offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • boat
  • technology

संबंधित बातम्या

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
1

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
2

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
3

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?
4

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.