BSNL सिमवर वेगवान इंटरनेट चालेल
Jio-Airtel-Vi च्या रिचार्ज प्लॅन्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, त्यामुळे अनेक युजर्स आता नाराज झाले आहेत. रिचार्ज वाढीनंतर आता अनेक युजर्स BSNL कडे वळले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता BSNL 4G सुरू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आपणदेखील याचा फायदा घेऊ शकता. पण हे वापरण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काही सेटअप करावे लागेल. स्मार्टफोनमध्ये BSNL 4G कसा सेटअप केला जाऊ शकतो, याबाबत आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहोत . वास्तविक, फास्ट इंटरनेट सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचे पालन करावे लागेल.
हेदेखील वाचा – घरी जाताच स्मार्टफोनचा नेटवर्क गायब होतोय? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा
सध्या BSNL ची मागणी झपाट्याने वाढत आहे. जर तुम्हाला नवीन सिम घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये BSNL चा समावेश करू शकता. याशिवाय कंपनीचा यूजर बेसही आता खूप वाढला आहे. त्यामुळे आता हा ट्रेंडमध्ये आहे. खरं तर आता BSNLचे 4G नंतर 5G वर देखील काम सुरु झाले आहे आणि लवकरच त्याची सेवा सुरु होणार आहे. मात्र, अद्याप 5G नेटवर्कबाबत काही अधिकृत माहिती मिळालेली नाही आणि अद्याप सुरूही झालेले नाही.