आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आज प्रत्येक कामात आपल्याला आपल्या स्मार्टफोनची मदत होते अशात जर याचे नेटवर्क काम करत नसले तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एखादी महत्त्वाची फाइल कोणाला पाठवायची असेल तर ती पाठवता येत नाही तसेच कॉल लागत नाही आणि अशा अनेक समस्या आपल्यसमोर उभ्या राहतात. स्मार्टफोनच्या मदतीने आपण अनेक कामे अगदी घरी बसून अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण करू शकता, परंतु जर यात नेटवर्क नसेल तर ही सर्व कामे करता येत नाहीत.
वास्तविक, बरेच लोक तक्रार करतात की ते बाहेर असताना सर्व नेटवर्क त्यांच्या फोनवर उपलब्ध असतात, परंतु घरी येताच फोनचे सर्व टॉवर गायब होतात. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला ही समस्या कायमची दूर करण्यासाठी एक सोप्या उपाय सांगत आहोत.
हेदेखील वाचा – तुमच्या नावावर किती नंबर चालू आहेत? चेक करण्यासाठी ‘हा’ सोपा मार्ग वापरा
घरी येताच फोनचे नेटवर्क गेले, तर फोन एअरप्लेन मोडवर ठेवा आणि काही वेळाने तो काढून टाका. तसेच फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन नेटवर्क रीसेट करा. अनेक वेळा असे केल्याने नेटवर्कची समस्या दूर होते.
घरी येताच जर फोनचे सर्व नेटवर्क उडाले असेल तर प्रथम घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडा. किंबहुना अनेक वेळा घर बांधताना वापरण्यात येणारे काँक्रीट, लोखंड, धातू इत्यादी साहित्य मोबाईल नेटवर्क ब्लॉक करतात. त्यामुळे घरामध्ये नेटवर्क व्यवस्थित उपलब्ध होत नाही.
तुम्ही फोन घरी घेऊन जाताच टॉवर गायब झाल्यास, तुम्ही वाय-फाय कॉलिंगचा अवलंब करू शकता. तथापि, यासाठी तुमच्या फोनमध्ये वाय-फाय कॉलिंगचा सपोर्ट असायला हवा.
फोन घरी जाताच नेटवर्क हरवल्यास, कधीकधी ही समस्या सिम कंपनीमुळे देखील होते. अशा परिस्थितीत, सिम कंपनीशी संपर्क साधा आणि त्यांना तुमच्या समस्येबद्दल तपशीलवार माहिती द्या. यावर ते उत्तम उपाय सांगू शकतात.