
BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची ‘Kickstart 2026’ ऑफर, केवळ 1 रुपयांत मिळणार कॉल आणि डेटा बेनिफिट्स
कंपनीने सादर केलेल्या ‘Kickstart 2026’ ऑफरअंतर्गत यूजर्सना केवळ 1 रुपयांत सिम कार्ड खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच यूजर्सना 30 दिवसांची अनलिमिटेड कनेक्टिविटी देखील ऑफर केली जाणार आहे. कंपनीच्या या ऑफरमुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांची पुन्हा एकदा झोप उडाली आहे. कंपनी सतत त्यांच्या यूजर्ससाठी नवीन ऑफर्स आणि रिचार्ज प्लॅन घेऊन येत आहे. नवीन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनीच्या या ऑफर्स फायद्याच्या ठरत आहेत. कंपनीने सादर केलेली ‘Kickstart 2026’ ऑफर अशा यूजर्ससाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे, जे कमी किंमतीत एका विश्वसनीय नेटवर्कच्या शोधात आहेत. कंपनीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नवीन ऑफरबाबत माहिती दिली आहे. कंपनीने या नवीन ऑफरला ‘Kickstart 2026’ ऑफर असे नाव दिले आहे. या 1 रुपयांच्या ऑफरमध्ये कोणते फायदे मिळणार जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Kickstart 2026 with BSNL’s ₹1 Offer featuring 30 days of unlimited connectivity and 2GB daily data, 100 SMS/day, unlimited calls @ just Rs 1. Walk into your nearest BSNL CSC or retailer today!
Offer valid till 31st January, 2026.#BSNL #DigitalBharat #BSNLOffer #RechargeNow… pic.twitter.com/ZWOR2blpnG — BSNL India (@BSNLCorporate) January 3, 2026
BSNL च्या स्पेशल ऑफरअंतर्गत कंपनी केवळ 1 रुपयांत त्यांच्या ग्राहकांना नवीन सिम कार्ड खरेदी करण्याची संधी देत आहे. याची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग देखील ऑफर केले जाते. याव्यतिरिक्त या स्पेशल ऑफरमध्ये कंपनी त्यांच्या ग्राहकांना रोज 2GB हाई-स्पीड डेटा ऑफर करते. बीएसएनएलची 4G सर्विस आता देशाच्या अनेक भागांमध्ये सुरू झाली आहे, त्यामुळे तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेट देखील मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस संदेश देखील समाविष्ट आहेत. एकंदरीत, तुम्हाला खूप कमी किमतीत संपूर्ण मासिक प्लॅन मिळत आहे.
टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर
BSNL ने सोशल मीडियावर घोषणा केली आहे की, ही ऑफर ऑनलाइन उपलब्ध नाही. मात्र ग्राहक त्यांच्या जवळच्या BSNL CSC (कॉमन सर्विस सेंटर) किंवा रिटेल स्टोअरवरून या सर्विसचा लाभ घेऊ शकणार आहेत. इच्छुक ग्राहक त्यांच्या जवळच्या बीएसएनएल केंद्राला भेट देऊ शकतात आणि फक्त 1 रुपयामध्ये नवीन सिम कार्ड मिळवू शकतात. कंपनीच्या मते, ही खास ऑफर फक्त 31 जानेवारीपर्यंत वैध आहे, म्हणजेच तुमच्याकडे ही संधी मर्यादित काळासाठी आहे.
Ans: काही भागांत 4G सेवा सुरू झाली असून देशभर टप्प्याटप्प्याने विस्तार केला जात आहे.
Ans: 4G पूर्ण झाल्यानंतर BSNL 5G सेवा सुरू करण्याची योजना आहे.
Ans: हो, BSNL चे प्लॅन Jio-Airtel पेक्षा तुलनेने किफायतशीर असतात.