BSNL चा हा प्लॅन झाला 100 रुपयांनी स्वस्त! मिळेल 60mbps ची स्पीड
नुकतेच भारतातील अनेक लोकप्रिय टेक कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीमध्ये भरगोस वाढ केली. या वाढीनंतर अनेक युजर्स नाराज झाले. मात्र याचा फायदा सध्या BSNL ला होताना दिसत आहे. रिचार्ज वाढीनंतर आता अनेक युजर्स पुन्हा BSNL कडे वळले आहेत. याच पार्शवभूमीवर, BSNL ने आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. एकीकडे खासगी कंपन्यांची योजना महाग होत असताना BSNL ने आता आपल्या प्लॅनच्या किमती कमी केल्या आहेत. त्यातच आता BSNL ने आपले 15 हजार नवीन टॉवरदेखील ऍक्टिव्ह केले आहेत.
BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. वास्तविक, BSNL ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मान्सून डबल बोनान्झा ऑफर सादर केली आहे. ही ऑफर भारत फायबर ब्रॉडबँड ग्राहकांसाठी आहे. BSNL च्या या फायबर प्लानची पूर्वीची किंमत 499 रुपये होती. कंपनीने आता हा प्लान 100 रुपयांनी कमी केला आहे, त्यानंतर या प्लानची किंमत आता 399 रुपयांवर आली आहे.
हेदेखील वाचा – BSNL ने देशभरात लावले 15000 नवीन 4G टावर्स, 5G साठी आला नवा अपडेट!
दरम्यान कंपंनीने ही ऑफर फक्त सुरुवातीच्या तीन महिन्यांसाठी जारी केली आहे. म्हणजेच हा प्लॅन सक्रिय केल्यानंतर तुम्हाला तो तीन महिन्यांसाठी 399 रुपयांमध्ये मिळेल. यानंतर तुम्हाला या प्लॅनसाठी फक्त 499 रुपये द्यावे लागतील.
#MonsoonDoubleBonanza Alert!
Enjoy our Fibre Basic Plan at just ₹399/month, down from ₹499! Plus, get your first month FREE! Limited time offer. T&C apply.Say ‘Hi’ on WhatsApp at 1800-4444 for more details!#BharatFibre #BSNLFTTH #BSNL #SwitchToBSNL pic.twitter.com/rNKIvGDDsk
— BSNL India (@BSNLCorporate) August 5, 2024
BSNL च्या या प्लानमध्ये यूजर्सना एकूण 3300GB इंटरनेट डेटा मिळतो. तसेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला 60 Mbps चा हाय-स्पीड मिळते. डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 4Mbps होतो. कंपनीने आपल्या नवीन ग्राहकांसाठी हा प्लॅन सादर केला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही हा प्लॅन घ्यायचा असेल, तर तुम्ही 18004444 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे मेसेज पाठवून ते करू शकता.याद्वारे तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. BSNL च्या या व्हॉट्सॲप सुविधेमुळे अनेकांचा वेळ वाचला जाणार आहे. दरम्यान BSNL आपल्या 5G सेवेवर काम करत असून लवकरच 5G सेवा सुरु करणार असल्याने समजत आहे.