ChatGPT 5 vs ChatGPT 4: रीजनिंग, आउटपुट आणि परफॉर्मंसच्या बाबतीत कोण अधिक पावरफुल? जाणून घ्या सविस्तर
मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या OpenAI ने अलीकडेच त्यांचे लेटेस्ट एआई मॉडल GPT-5 लाँच केलं आहे. नवीन अपग्रेड आणि जबरदस्त फीचर्ससह हे अपडेटेड GPT-5 लाँच करण्यात आलं आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे आतापर्यंतचं सर्वात पावरफुल आणि दमदार आर्टिफिशियल इंटेलिजेंस मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये युजर्सना आतापर्यंतचा सर्वात चांगला अनुभव मिळणार आहे. कारण यामधील फीचर्स अपग्रेड करण्यात आले आहेत. सध्या हे नवीन GPT-5 सर्व चॅटजीपीटी युजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक चॅटजीपीटी युजर GPT-5 चा वापर करू शकतो.
OpenAI चं असं म्हणणं आहे की, या मॉडेलचे बेसिक वर्जन युजर्स मोफत वापरू शकतात. त्यासाठी त्यांना कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. हे नवीन मॉडेल GPT-4 च्या तुलनेत रीजनिंग, रिस्पॉन्स आणि सुरक्षेच्या बाबतीत अधिक उत्तम आहे. या मॉडेलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. ज्यामुळे युजर्सना त्यांच्या प्रश्नांच्या अचूक उत्तरासोबतच अधिक चांगला अनुभव मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रीजनिंग: GPT-5 आणि GPT-4 मधील एक मुख्य अंतर म्हणजेच याची रीजनिंग कॅपेबिलिटी. OpenAI ने सांगितलं आहे की, GPT-5 ला उत्तर देण्यापूर्वी विचार करण्याची ट्रेनिंग देण्यात आली आहे. हे मॉडेल आधीच्या मॉडेलच्या तुलनेत अचूक आणि प्रसंगानुसार उत्तर देते.
सटीक आउटपुट: OpenAI ने सांगितलं आहे की, GPT-5 डेव्हलप करताना ते कोणतेही चुकीची माहिती युजर्सना देऊ नये, यावर अधिक लक्ष देण्यात आले आहे. यासोबतच, भ्रम कमी करणे आणि पारदर्शकता वाढवण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
परफॉर्मेंस: GPT-5 बाबत OpenAI चं असं म्हणणं आहे की, हे मॉडेल GPT-4 च्या तुलनेत अधिक जलद आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की हे मॉडेल लेखन, कोडिंग, शिक्षण आणि आरोग्यसेवेशी संबंधित बाबींसाठी फारसे चांगले नाही.
नवीन टूल्स: GPT-5 मध्ये कंपनीने OpenAI चे सर्व टूल्स इंटीग्रेट केले आहेत. त्यामुळे आता यूजर्स वेब सर्च, इमेज जनरेशन, वॉइस कैपेबिलिटीज आणि एडवांस क्रिएटिव टूल सारखे कॅन्वास एकाच इंटरफेसवर वापरू शकतात. यासोबतच GPT-5 मध्ये माइक्रोसॉफ्टचे प्रोडक्ट जसे Microsoft 365 Copilot आणि Azure AI Foundry देखील वापरू शकतात.
OpenAI चे लेटेस्ट एआई मॉडेल ChatGPT 5 ने कंपनीच्या सर्वाच जुने मॉडेल्स ChatGPT 4 आणि ChatGPT 4o ला रिप्लेस केले आहे. याचा अर्थ असा की वापरकर्ते नवीन GPT-5 थेट ChatGPT च्या वेबसाइट किंवा अॅपवरून वापरू शकतात. कंपनीने त्याचे तीन वर्जन लाँच केले आहेत.