Snapchat, WPP मीडिया आणि Lumen यांनी केले ‘Attention Advantage’ रिसर्चचे अनावरण, डिजिटल जाहिरातींचं नव्याने ठरतंय भविष्य
भारताच्या Gen Z युथमध्ये Snapchat ची प्रचंड क्रेझ आहे. हे प्लॅटफॉर्म केवळ फोटोंसाठीच नाही तर मेसेजिंगसाठी देखील वापरले जाते. या लोकप्रिय प्लॅटफॉर्म Snapchat ने जागतिक मीडिया एजन्सी WPP मीडिया आणि अटेंशन मोजणारी आघाडीची संस्था Lumen यांच्यासोबत भागीदारी करत ‘Attention Advantage’ नावाचा भारतातील सर्वात मोठा अटेंशन रिसर्च सादर केला आहे. या रिसर्चमधून डिजिटल जाहिरातींना मोजण्याची एक नवीन पद्धत, नवीन मापदंड आणि Gen Z ला प्रभावीपणे टार्गेट करण्याचा नवीन मार्ग सुचवण्यात आला आहे. यामुळे आता असा अंदाज आहे की, भारतातील डिजिटल जाहिरातींचे भविष्य नव्याने ठरवले जाणार आहे. या अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की जाहिरातींकडे खरे लक्ष दिले गेले की त्याचा व्यवसायावर थेट परिणाम होतो.
हा रिसर्च खूप महत्त्वाच्या वेळेस आला आहे. भारतातील 377 दशलक्ष Gen Z लोक मिळून 2035 पर्यंत 2 ट्रिलियन डॉलर खर्च करू शकतील असा अंदाज आहे. Gen Z लोकं लक्ष वेधून न घेणाऱ्या जाहिरातींना ते लगेच स्किप करतात. ‘Attention Advantage’ रिसर्च म्हणजे खरे काय याबाबत जाणून घेऊया.
3,000 पेक्षा जास्त भारतीय सहभागींच्या डेटावर आधारित, Lumen च्या खास टेक्नॉलॉजीने विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्हिज्युअल अटेंशन मोजले. WPP मीडिया अंतर्गत विविध ब्रँड्सनी जसे की FMCG, ऑटो, फॅशन आणि QSR यांनी एकाच मोहिमेअंतर्गत जाहिराती चालवल्या आणि काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले. यातील काही निष्कर्षांबद्दल आता जाणून घेऊया.
Mike Follett, CEO, Lumen Research म्हणाले, “आमची टेक्नॉलॉजी ‘दृश्य नसलेले’ गोष्टी स्पष्ट करते. हा अभ्यास सिद्ध करतो की खरे मानवी लक्ष हेच व्यवसायिक यशाचे सर्वात मोठे भविष्यवाणी करणारे घटक आहे. Snapchat सारख्या प्लॅटफॉर्मवर अटेंशन पातळी पारंपरिक प्लॅटफॉर्म्सपेक्षा 2 पट जास्त आहे.”
Amin Lakhani, प्रेसिडेंट, क्लायंट सोल्यूशन्स, WPP मीडिया यांनी सांगितलं की, “आमच्या क्लायंट्सना नेहमी गुंतवणुकीवर स्पष्ट रिटर्न पाहिजे असतो. हा अभ्यास आमच्यासाठी एक अटेंशन प्लेबुक घेऊन आला आहे. ज्यामुळे आम्ही चांगल्या व अधिक प्रभावी मीडिया योजना तयार करू शकतो.”
Amit Chaubey, हेड ऑफ मार्केटिंग सायन्स, Snap Inc. APAC यांनी सांगितलं की, “आजच्या डिजिटल युगात ‘attention’ ही फक्त चांगली गोष्ट नाही, तर ती प्रभावी जाहिरातींसाठी सर्वात महत्त्वाचा मापदंड आहे. ‘Attention Advantage’ फक्त लक्षाचे महत्त्व सांगत नाही, तर ब्रँड्सना एक व्यावहारिक प्लॅन देतो ज्याच्या मदतीने ते लक्ष मिळवू शकतात आणि ते व्यवसायिक यशात बदलू शकतात.”
Snapchat Advantage: Gen Z चं लक्ष खेचणारा प्रमुख प्लॅटफॉर्म पारंपरिक सोशल प्लॅटफॉर्म्सवर Gen Z 34% कमी लक्ष देते, पण Snapchat वर ते अत्यंत अॅक्टिव्ह असतात. Snapchat वर अटेंशन 2 पट जास्त आहे. AR Lenses हे सर्वात प्रभावी फॉर्मॅट आहेत. हे इतर कोणत्याही फॉर्मॅटपेक्षा 2x जास्त अॅक्टिव अटेंशन मिळवतात. Snapchat मीडिया मिक्समध्ये जोडल्याने Gen Z लक्षात 22% पर्यंत वाढ होऊ शकते.
The Attention Playbook: ब्रँड्ससाठी तीन महत्वाचे टीप्स. पहिलं योग्य प्लॅटफॉर्म निवडा. Gen Z जेथे अॅक्टिव्ह आहे तिथेच ब्रँड्सनी उपस्थित राहावे. दुसरं फॉर्मॅट महत्त्वाचा आहे. Non-skippable व्हिडिओ आणि AR लेंसचा संगम सर्वात चांगले परिणाम देतो. तिसरं Authentic UGC स्टाइल, ब्रँडिंग आणि आकर्षक म्युझिकसह क्रिएटिव्ह लक्ष वेधून घेतात आणि Gen Z शी चांगला कनेक्शन तयार करतात.