Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google वर लीक झाले ChatGPT युजर्सचे पर्सनल चॅट! तुमच्या संभाषणाचाही समावेश आहे का? असं करा चेक

तुम्ही देखील ChatGPT सोबत तुमच्या पर्सनल गोष्टी शेअर करताय का? थांबा, ChatGPT वरील हजारो चॅट्स गुगलवर लीक झाले आहेत. हे सर्व ज्या फीचरमुळे झालं आहे, ते फीचर आता कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 02, 2025 | 08:51 AM
Google वर लीक झाले ChatGPT युजर्सचे पर्सनल चॅट! तुमच्या संभाषणाचाही समावेश आहे का? असं करा चेक

Google वर लीक झाले ChatGPT युजर्सचे पर्सनल चॅट! तुमच्या संभाषणाचाही समावेश आहे का? असं करा चेक

Follow Us
Close
Follow Us:
  • ChatGPT युजर्सचे पर्सनल चॅट्स गुगलवर लीक
  • OpenAI ने संपूर्ण प्रकरणावर दिली प्रतिक्रीया
  • OpenAI ने ChatGPT मधील फीचर केलं बंद

 

ChatGPT युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ChatGPT युजर्सचे पर्सनल चॅट गुगलवर लीक झाले आहेत. यामध्ये हजारो युजर्सच्या चॅट्सचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युजर्स ChatGPT सोबत जे काही संभाषण करतात, ते संभाषण आता गुगलवर लिक झालं आहे. मानसिक आरोग्य, व्यसन, लैंगिक जीवन आणि ऑफिसमधील समस्या या संभाषणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या चॅट्स पूर्णपणे सार्वजनिक नव्हत्या, परंतु जर कोणी ChatGPT चे “Share” बटण दाबून लिंक शेअर केली आणि “Make this chat discoverable” पर्याय चालू केला, तर ते चॅट गुगलवरील सर्च दरम्यान दिसू लागले होते.

OPPO K13 टर्बो सीरीज ऑगस्टमध्ये होणार लाँच, मोबाईल गेमर्ससाठी वरदान ठरणार नवीन डिव्हाईस

OpenAI ने बंद केलं फीचर

चॅट लीक झाल्याचं समोर येताच युजर्सनी मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली होती. याबाबत OpenAI ने प्रतिक्रिया देखील दिली आहे, ज्या फीचरमुळे युजर्सचे चॅट्स लीक झाले होते, ते फीचर बंद करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, OpenAI ने ChatGPT चे अस एक फीचर बंद केलं आहे ज्यामुळे यूजर्सचे पर्सनल चॅट्स गूगल सर्चमध्ये दिसत होते. या फीचर्समुळे हजारो युजर्सचे चॅट्स पब्लिक डोमेनवर दिसू लागले होते. यापैकी काहींमध्ये यूजर्सच्या ओळखीशी संबंधित संवेदनशील माहिती देखील होती.  (फोटो सौजन्य – Pinterest)

🚨 Google has started indexing shared ChatGPT conversations. Yes, it is a privacy nightmare but here’s how to access it and use it to your advantage:

– Use it as a way to do market research. Just go to Google, type in “site:chatgpt .com/share” plus any keyword. Now you will see… pic.twitter.com/isWtlMXqsC

— Aryan Raj (@aryanistweeting) July 31, 2025

संपूर्ण प्रकरणी OpenAI ने काय म्हटलं?

या संपूर्ण प्रकरणावर ChatGPT ची निर्माता कंपनी OpenAI ने प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, “Make this chat discoverable” फीचर एक छोटा प्रयोग होता, जे आता बंद करण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे या फीचरमुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली होती. आता ChatGPT च्या शेयर विंडोमधून हे ऑप्शन काढून टाकण्यात आलं आहे. तसेच, OpenAI वेबसाइटवर हे स्पष्ट करण्यात आले आहे की जोपर्यंत यूजर स्वतः ते डिस्कवरएबल करत नाही तोपर्यंत कोणतेही चॅट सार्वजनिक होत नाही.

चॅट कसे लीक झाले?

ChatGPT मध्ये एक “शेयर” फीचर असतं. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे चॅट्स व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकतात. मात्र या फीचरमध्ये असलेलं “Make this chat discoverable” ऑन केलं तर लिंक सर्च इंजिनद्वारे इंडेक्स होते आणि चॅट्स सार्वजनिक होतात. रिपोर्ट्सनुसार, गूगलवर site:chatgpt.com/share सर्च केल्यानंतर सुमारे 4500 चॅट्स समोर आले.

Tech Tips: आता स्मार्टफोनमध्ये Removable बॅटरी का नाही देत? टेक्नोलॉजीची कमाल की कंपन्यांची चाल? जाणून घ्या सत्य

तुमचे चॅट्स लीक झाले का?

जर तुम्ही कधी ChatGPT संभाषण शेअर केले असेल, तर तपासू शकता की ते चॅट्स अजूनही ऑनलाइन आहे की नाही. यासाठी, ChatGPT सेटिंग्जमध्ये जा, नंतर ‘डेटा कंट्रोल्स’ वर क्लिक करा आणि ‘शेअर्ड लिंक्स’ वर जा. तिथे तुम्हाला तुम्ही शेअर केलेल्या सर्व लिंक्स दिसतील आणि तुम्ही तेथून त्या डिलीट देखील करू शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

ChatGPT कधी लाँच करण्यात आलं?

३० नोव्हेंबर २०२२

ChatGPT ची मालक कंपनी कोणं आहे?

OpenAI

जगातील पहिलं चॅटबोट कोणतं?

ChatGPT

Web Title: Chatgpt chats leaked on google then company shuts down this related feature tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 08:51 AM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • google

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Krishna Janmashtami: AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी, ChatGPT च्या या प्रॉम्प्ट्सनी क्षणातच तयार करा अप्रतिम श्रीकृष्णा आर्ट
2

Krishna Janmashtami: AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी, ChatGPT च्या या प्रॉम्प्ट्सनी क्षणातच तयार करा अप्रतिम श्रीकृष्णा आर्ट

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर
3

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर

ChatGPT प्लॅनचे पेमेंट आता डॉलर्समध्ये नाही भारतीय रुपयांमध्ये, कंपनीने केला मोठा बदल! या आहेत नव्या किंमती
4

ChatGPT प्लॅनचे पेमेंट आता डॉलर्समध्ये नाही भारतीय रुपयांमध्ये, कंपनीने केला मोठा बदल! या आहेत नव्या किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.