Tech Tips: आता स्मार्टफोनमध्ये Removable बॅटरी का नाही देत? टेक्नोलॉजीची कमाल की कंपन्यांची चाल? जाणून घ्या सत्य
पण तुम्ही कधी जुने स्मार्टफोन्स पाहिले आहेत का? जुने स्मार्टफोन्स आणि आताच्या स्मार्टफोनमधील सर्वात मोठा फरक म्हणजेच त्यांची बॅटरी. जर तुम्ही २०१५ पूर्वी स्मार्टफोनचा वापर केला असेल, तर तुम्हाला माहिती असेल की जुन्या स्मार्टफोनमधील बॅटरी काढणं अगदी सहज शक्य होतं. मात्र सध्याच्या स्मार्टफोनमध्ये non-removable बॅटरी दिली जाते. ही बॅटरी काढणं जपळपास अशक्य आहे. पण अशी बॅटरी देण्यामागील कारणं कोणती आहेत? (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या लांच केले जाणारे स्मार्टफोन्स प्रचंड हलके आणि स्लिम असतात. अशा परिस्थितीत जर या स्मार्टफोनमध्ये निघणारी बॅटरी दिली तर फोनचे डिझाईन जाड झाले असते, तर फिक्स बॅटरीमुळे कंपन्यां स्मार्टफोनन्सना आकर्षक आणि प्रीमियम लूक देऊ शकतात.
IP67 किंवा IP68 सारखी रेटिंग्स स्मार्टफोनमध्ये देणं तेव्हाच शक्य आहे, विशष करून जेव्हा फोन सील्ड असेल. जर फोनमध्ये निघणारी बॅटरी दिली तर पाणी आणि धूळ अगदी सहज फोनमध्ये प्रवेश करू शकतात. यामुळे कंपन्या आता फोनमध्ये sealed यूनिबॉडी डिझाईन देतात.
नवीन तंत्रज्ञानाच्या बॅटरी जलद चार्ज होतात आणि जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी अनेक सुरक्षा स्तरांसह येतात. फिक्स बॅटरीसह हे सुरक्षा उपाय अंमलात आणणे सोपे आहे.
गावांमध्ये किंवा लहान शहरांमध्ये, जिथे सेवा केंद्रे खूप दूर आहेत, बॅटरी बदलणे ही एक मोठी डोकेदुखी बनते. पूर्वी लोक बॅटरी विकत घ्यायचे आणि स्वतः बदलायचे, पण आता यासाठी तंत्रज्ञांची आवश्यकता आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या बॅटरी जलद चार्ज होतात का?
हो
स्लिम आणि कॉम्पॅक्ट डिझाइन युजर्सना आवडतात का?
बरेच युजर्स जुन्या मॉडेलपेक्षा स्लिम डिझाईनला प्राधान्य देतात






