Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! ChatGPT च्या Free Ghibli-स्टाईल ट्रेंडने उडवली इतर AI कंपन्यांची झोप, 1 तासात जोडले तब्बल इतके लाख युजर्स

ChatGPT Ghibli Images Trend: चॅटजीपीटीने सुरु केलेल्या Ghibli ट्रेंडचा युजर्सना प्रचंड फायदा झाला आहे. कंपनीला सुरुवातीला जे युजर्स जोडण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागला होता, तीच कामगिरी आता 1 तासात करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 01, 2025 | 11:15 AM
काय सांगता! ChatGPT च्या Free Ghibli-स्टाईल ट्रेंडने उडवली इतर AI कंपन्यांची झोप, 1 तासात जोडले तब्बल इतके लाख युजर्स

काय सांगता! ChatGPT च्या Free Ghibli-स्टाईल ट्रेंडने उडवली इतर AI कंपन्यांची झोप, 1 तासात जोडले तब्बल इतके लाख युजर्स

Follow Us
Close
Follow Us:

जगातील पहिला AI चॅटबोट म्हणजे ओपनएआयचा ChatGPT. ओपनएआयने ChatGPT लाँच केल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांचे वेगवेगळे AI लाँच केले. कोणी फ्री युजर्ससाठी AI लाँच केला, तर कोणी पेड युजर्ससाठी AI लाँच केला. बघता बघता, प्रत्येक कंपनीने त्यांचा स्वत:चा AI चॅटबोट रोलआऊट केला आणि जगातील पहिल्या AI चॅटबोटसाठी कठीण स्पर्धा निर्माण झाली. असं देखील सांगितंल जात आहे की, ChatGPT आपल्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करण्यापेक्षा लोकं स्मार्टफोनमध्ये बिल्ड असलेल्या गुगलच्या जेमिनीचा आणि मेटा AI चा वापर करू लागली.

Instagram रिल्स लाईक करा आणि कमवा हजारो रुपये; सुरु झाला नवा स्कॅम, महिलेला घातला लाखोंचा गंडा

ChatGPT तयार केला नवीन रेकॉर्ड

पण आता संपूर्ण परिस्थिती पलटली आहे. गेल्या आठडाभरात ChatGPT ने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. ChatGPT ने केवळ एका तासात तब्बल 10 लाख नवीन युजर्स जोडले आहेत. हे सर्व शक्य झाले आहे, Ghibli मुळे. कंपनीने त्यांच्या पेड आणि फ्री युजर्ससाठी Ghibli स्टाईल ईमेजचे फीचर सुरु केलं. एका रात्रीत हे फीचर प्रचंड लोकप्रिय झाले. आपले फोटो Ghibli स्टाईलमध्ये रुपांतरित करण्यासाठी लोकं ChatGPT मध्ये लॉगिन करू लागली. अशा प्रकारे ज्या AI कडे दुर्लक्ष केलं जात होतं, त्यानेच सर्वांची झोप उडवली. कंपनीने अगदी 1 तासातच 10 लाख नवीन युजर्स जोडले. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ही कामगिरी जाहीर केली आणि ही आतापर्यंतची सर्वात अभूतपूर्व आणि जलद युजर्स वाढ असल्याचं म्हटले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Ghibli स्टाईलचा सोशल मीडियावर धुमाकूळ

ChatGPT मध्ये Ghibli-शैलीतील प्रतिमा जनरेटर आता विनामूल्य युजर्ससाठी देखील उपलब्ध आहे. पूर्वी हे फीचर फक्त पेड सबस्क्राइबर्ससाठी होते, परंतु 29 मार्चपासून ते सर्व युजर्ससाठी सुरु करण्यात आले. या वैशिष्ट्याद्वारे, युजर्स त्यांचे फोटो स्टुडिओ Ghibli च्या प्रसिद्ध अ‍ॅनिमेशनमध्ये रूपांतरित करू शकतात. कंपनीने हे फीचर सुरु करताच अगदी काही क्षणातच ते लोकप्रिय झाले.

काय म्हणाले सॅम ऑल्टमन?

सॅम ऑल्टमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, ’26 महिन्यांपूर्वी जेव्हा चॅटजीपीटी लाँच करण्यात आले तेव्हा ते सर्वात व्हायरल इव्हेंटपैकी एक होते. तेव्हा आम्ही 5 दिवसांतच 10 लाख युजर्स जोडले होते. आत्ताच विचार केला तर आता केवळ 1 तासातच आम्ही 10 लाख युजर्स जोडले आहेत.’

the chatgpt launch 26 months ago was one of the craziest viral moments i’d ever seen, and we added one million users in five days. we added one million users in the last hour. — Sam Altman (@sama) March 31, 2025

सोशल मीडिया युजर्सचं Ghibli वेड कमीच होईना, OpenAI च्या CEO ने केली एक्सवर पोस्ट; म्हणाला, टीमला आरामाची गरज…

मोफत Ghibli-शैलीतील इमेज जनरेटर लाँच झाल्यानंतर चॅटजीपीटीची लोकप्रियता आणखी वाढली आहे. यावरून हे स्पष्ट होते की AI-चालित सर्जनशील साधनांची मागणी वेगाने वाढत आहे. तथापि, या वैशिष्ट्याच्या वाढत्या मागणीमुळे ओपनएआयच्या सर्व्हरवर मोठा भार पडत आहे, ज्यामुळे ऑल्टमन युजर्सना ‘थोडा वेग कमी करण्याची आणि कमी प्रतिमा निर्माण करण्याची’ विनंती करत आहे. यासंबंधित त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट देखील शेअर केली होती.

चॅटजीपीटीवर अशा प्रकारे तयार करा Ghibli ईमेज

  • तुमच्या ChatGPT अकाऊंटमध्ये लॉग इन करा. हे वैशिष्ट्य GPT-4o मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.
  • तुमचा फोटो अपलोड करा आणि Convert Into Ghibli Image असा प्रॉम्प्ट द्या.
  • आता AI काही सेकंदात तुमची इमेज जनरेट करेल.
  • जर प्रतिमा तुमच्या अपेक्षेनुसार नसेल, तर प्रॉम्प्ट समायोजित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
  • एकदा प्रतिमा तुम्हाला आवडली की, ती तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड करा आणि इतरांसोबत शेअर करा.

Web Title: Chatgpt ghibli art generator ai hits one million user in hour tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.