Diwali 2024: यंदाच्या दिवाळीला आई-वडिलांना गिफ्ट करा 10 हजाराहून कमी किमतीचा दमदार स्मार्टफोन
दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यानिमित्त लोक आपल्या प्रियजनांना भेटवस्तू गिफ्ट करतात. जर तुम्हीही तुमच्या आई-वडिलांसाठी दिवाळीनिमित्त कोणती भेटवस्तू शोधत असाल, जी त्यांच्यासाठी नेहमीच अविस्मरणीय असेल. तर तुम्ही त्यांना नवीन एक स्मार्टफोन भेट करू शकता. आता स्मार्टफोन म्हटलं की खर्च आलाच. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. तुमचे बजेट कमी असले तर तुम्ही तुमच्या प्रियजनांची एक उत्तम दर्जाचा फोन खरेदी करू शकता.
आज आम्ही तुम्हाला कमी किमतीत उपलब्ध होणार एक दमदार स्मार्टफोनविषयी सांगत आहोत. हा मोटोरोलाचा फोन आहे जो परवडणाऱ्या किमतीत चांगले फीचर्स देतो. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून ऑफरसह खरेदी करता येईल. दिवाळीत तुम्ही तुमच्या पालकांना हा बजेट रेंजचा फोन गिफ्ट केल्यास त्यांच्यासाठी तो कायम संस्मरणीय होईल. या फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत.
हेदेखील वाचा – Jio-Airtel-Vi-BSNL युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहेत नियम
दिवाळीत आई-वडिलांना भेट करा नवीन स्मार्टफोन
Motorola g45 5G फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीची दिवाळी भेट ठरू शकतो. या फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Flipkart वर 9,999 रुपये आहे. यामध्ये दिलेली रॅम 16 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. यावर फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सना 5 टक्के कॅशबॅकचा लाभही दिला जात आहे.
तुमच्याजवळ जुना फोन पडून असेल तर तुम्ही त्याला एक्सचेंज करून किंमत 6,800 रुपयांनी कमी करू शकता. मात्र, याचा फायदा घेण्यासाठी फोनची स्थिती चांगली असायला हवी. स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटमध्ये देखील येतो, जो शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर 11,999 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध आहे.
यावर एक्सचेंज आणि बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. यात ब्रिलियंट ब्लू, ब्रिलियंट ग्रीन आणि व्हिवा मॅजेन्टा कलर पर्याय उपलब्ध आहेत. हा फोन विगन लेदर फिनिशसह येतो. पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी याला IP54 रेटिंग देखील आहे. मोठी बॅटरी असूनही, हा फोन हाताळायला फार हलका आहे.
हेदेखील वाचा – ॲपलला मोठा धक्का! या देशात iPhone 16 वर बंदी, सरकारने केली मोठी कारवाई, धक्कादायक कारण आले समोर
Motorola g45 5G’चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
या फोनमध्ये 6.5 इंचाचा IPS LCD HD+ डिस्प्ले दिला गेला आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट आणि 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो.
प्रोसेसर
फोन Qualcomm SD 6s Gen 3 6nm प्रोसेसरवर काम करतो. हा क्वालकॉमचा एंट्री लेव्हल चिपसेट आहे.
कॅमेरा
फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP दुय्यम कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 16MP सेंसर आहे.
बॅटरी आणि चार्जिंग
फोन 18W चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या 5,000 mAh बॅटरीमधून पॉवर मिळवतो.