5G नेटवर्क वापरूनही मोबाईल इंटरनेटचा स्पीड कमी! ही सेटिंग देईल तुम्हाला सुपरफास्ट नेटवर्क (फोटो सौजन्य - pinterest)
तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसेल तर तुमचा स्मार्टफोन काय कामाचा? इंटरनेटशिवाय स्मार्टफोनचा वापर अपूर्ण आहे. फोनमध्ये इंटरनेट कनेक्शनमध्ये समस्या आल्यास अनेक महत्त्वाची कामे ठप्प होतात. इंटरनेटशिवाय तूम्ही WhatsApp, Instagram किंवा Facebook सारख्या सोशल मीडिया ॲप्सचा वापर करू शकत नाही. इंटरनेटशिवाय स्मार्टफोनवरून ट्रेनचे टिकीट काढू शकत नाही किंवा ट्रेनचा स्टेटस देखील चेक करू शकत नाही. इतकंच नाही तर इंटरनेटशिवाय तुम्ही ऑनलाइन ट्रांजेक्शन देखील करू शकत नाही.
हेदेखील वाचा- Reliance Jio चा ग्राहकांसाठी अलर्ट जारी; सावध रहा अन्यथा सायबर फसवणुकीला बळी पडाल
थोडक्यात काय तर इंटरनेटशिवाय स्मार्टफोन काहीच कामाचा नाही. तुमच्या स्मार्टफोनमध्ये जर इंटरनेट नसेल तर तुमची अनेक काम ठप्प होऊ शकतात. अनेक टेलिकॉम कंपन्या त्यांचे 5G नेटवर्क प्लॅन लाँच करत आहे. यामुळे या टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्सना नेटवर्क वापरताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये. पण अनेकदा हे 5G नेटवर्क सुध्दा योग्य प्रकारे काम करत नाही. 5G नेटवर्क वापरताना अनेक अडचणी येतात. तुम्ही प्रवासात 5G नेटवर्कचा वापर करत असाल, तर तुम्ही पाहत असलेले व्हिडीओ डाऊनलोड होत नाहीत.
काहीवेळा आपण अशा ठिकाणी फिरायला जातो जिथे इंटरनेटचा स्पीड खूप कमी असतो. अगदी तुम्ही 5G नेटवर्क वापरत असलात तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी इंटरनेटचा वेग कमी मिळतो. बऱ्याच वेळा एखाद्या विशिष्ट ठिकाणाबाबत अशी समस्या उद्भवते की इंटरनेटचा वेग खूपच कमी होतो. त्यामुळे आपली अनेक काम ठप्प होतात.
स्लो इंटरनेट स्पीडच कारण म्हणजे तुमचं डिव्हाईस स्लो नेटवर्क बँडविड्थ कॅप्चर करत आहे. जेव्हा तुम्ही उच्च बँडविड्थच्या आवाक्याबाहेर असता तेव्हा तुमचा स्मार्टफोन आपोआप कमी बँडविड्थवर स्विच होतो. हे अशा प्रकारे प्रोग्राम केलेले आहे कारण आपण सतत इंटरनेट सोबत कनेक्ट राहावं. जोपर्यंत तुम्ही उच्च बँडविड्थच्या आवाक्याबाहेर असाल तोपर्यंत तुमचं डिव्हाईस कमी बँडविड्थवरच काम करेल. पण जेव्हा तुम्ही पुन्हा उच्च बँडविड्थच्या श्रेणीत आल्यावर नेटवर्क आपोआप उच्च बँडविड्थवर स्विच करणार नाही.
हेदेखील वाचा- WhatsApp मधील टॉप 5 प्रायव्हसी फीचर्सबद्दल माहीत आहे का? जाणून घ्या सविस्तर
अशा वेळी तुम्हाला नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या स्थानावर 5G नेटवर्कवर काम करण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कोणत्याही समस्येशिवाय इंटरनेट वापरायचे असेल तर नेटवर्कचा प्रकार बदलणे आवश्यक आहे.