जगभरातील करोडो लोकं WhatsApp चा वापर करतात. फोटो, व्हिडीओ आणि फाईल्स शेअर करण्यासाठी WhatsApp चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. WhatsApp आज जगातील सर्वात मोठे मल्टीमीडिया इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे ज्याद्वारे कोणालाही फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स किंवा इतर कोणतीही फाईल पाठवणं सहज शक्य होतं. पण अशावेळी आपल्या फाईल्स किंवा फोटो सुरक्षित असणं गरजेचं असतं.
WhatsApp मधील टॉप 5 प्रायव्हसी फीचर्सबद्दल माहीत आहे का? जाणून घ्या सविस्तर (फोटो सौजन्य - pinterest)
तुम्ही सुद्धा WhatsApp चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. तुम्हाला WhatsApp मधील टॉप 5 प्रायव्हसी फीचर्सबद्दल माहीत आहे का?
End-to-End Encryption: WhatsApp वरील सर्व मेसेज, कॉल, फोटो, व्हिडिओ आणि इतर प्रकारची माहिती End-to-End Encryption, म्हणजे फक्त तुम्ही आणि तुम्ही ज्या व्यक्तिला पाठवत आहात तीच व्यक्ति ही माहिती पाहू शकते.
Read Receipts: त्याच्या मदतीने तुम्ही ठरवू शकता की तुम्ही पाठवलेला मॅसेज समोरच्या व्यक्तिने वाचला आहे की नाही.
WhatsApp (4)
Group Settings: या फीचरचा वापर करून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला ग्रुपमध्ये कोण ॲड करू शकेल. यासाठी तुमच्याकडे Everyone, My Contacts,आणि My Contacts Except असे पर्याय आहेत.
Two-Step Verification: हे वैशिष्ट्य तुम्हाला अतिरिक्त सुरक्षा स्तर प्रदान करते. ते सक्षम केल्यावर, तुम्हाला WhatsApp वर लॉग इन करण्यासाठी 6-अंकी पिन कोड प्रविष्ट करावा लागेल.