भारतातील आघडीच्या टेलिकॉम कंपन्यामध्ये jio, Airtel आणि vi चा समावेश होतो. कंपन्या त्यांच्या युजर्सना नेहेमी बेस्ट प्लॅन्स ऑफर करतात. त्यामुळे त्यांच्या युजर्स संख्येत लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळतं आहे. कंपन्या ग्राहकांना बेस्ट प्लॅन्स ऑफर करण्यासोबतच त्यांच्या यूजरच्या सुरक्षेची देखील तेवढीच काळजी घेतात. Reliance Jio ने नुकताच त्यांच्या युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. यामध्ये jio ने युजर्सना सायबर स्कॅमर्स पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
हेदेखील वाचा- Google Photos च्या नव्या फीचरची चाचणी सुरु; आता ब्लॉक करू शकाल एक्सचा चेहरा, पुन्हा कधीही दिसणार नाही जुन्या आठवणी
कंपनीने म्हटले आहे की, jio चे प्रतिनिधी म्हणून सायबर स्कॅमर्स ग्राहकांना कॉल, एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे त्यांचे वैयक्तिक तपशील विचारतात. याच पार्श्भूमीवर jio ने आपल्या ग्राहकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि थर्ड पार्टी ॲप्स टाळण्याचा आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
आपल्या ग्राहकांना चेतावणी देताना, jio ने एका संदेशात म्हटले आहे की, jio मध्ये तुमची सुरक्षा ही आमच्यासाठी नेहमीच सर्वात महत्त्वाची असते. अलीकडे, आम्ही सायबर फसवणुकीची प्रकरणे पाहिली आहेत जिथे स्कॅमर तुमच्या टेलिकॉम कंपनीचे प्रतिनिधी म्हणून आपली ओळख सांगतात आणि ग्राहकांना वैयक्तिक माहिती विचारतात. स्कॅमर वापरकर्त्यांची फसवणूक कशी करतात हे देखील कंपनीने स्पष्ट केले. याशिवाय युजर्सला ही समस्या कशी टाळता येईल याबद्दलही कंपनीने सांगितले आहे.
हेदेखील वाचा- पुढे पोलीस आहे, हेल्मेट घाला! वाहतूकीच्या दंडापासून वाचण्यासाठी आता Google Map देणार सूचना
कंपनीने म्हटले आहे की, स्कॅमर तुमच्याशी कॉल, एसएमएस, व्हॉट्सॲप चॅट किंवा ईमेल अशा अनेक मार्गांनी संपर्क साधू शकतात. हे स्कॅमर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर, आधार तपशील, बँक खाते तपशील, क्रेडिट कार्ड तपशील, OTP किंवा सिम नंबर यासारखी संवेदनशील आणि वैयक्तिक माहिती विचारतात. ही महिती देण्यास तुम्ही त्यांना नकार दिल्यास, ते तुमच्या सेवा बंद करण्याची धमकी देतात, जेणेकरून तुम्ही घाबरून त्यांच्याशी माहिती शेअर कराल. याशिवाय, स्कॅमर तुम्हाला थर्ड-पार्टी ॲप्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्यास सांगू शकतात, ज्यामुळे त्यांना तुमचा फोन किंवा कॉम्प्युटर आणि तुमच्या वैयक्तिक तपशीलांमध्ये प्रवेश मिळेल. jio ने असेही म्हटले आहे की आमची कंपनी कधीही आपल्या ग्राहकांना थर्ड पार्टी ॲप्स डाउनलोड करण्यास सांगणार नाहीत. तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर तो स्कॅम असू शकतो. त्यामुळे ग्रहकानी सुरक्षित राहण गरजेचं आहे.