फोटो सौजन्य -iStock
सध्या Split AC च्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. घरी ऑफीसमध्ये सर्वत्र Split AC असतो. पण काहीवेळा Split AC मध्ये बिघाड होतो, Split AC मधून पाणी पडतं. यामुळे AC च्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन AC खराब होतो. त्यामुळे Split AC दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च होतो. Split AC मध्ये बिघाड झाल्यास आपण टेक्निशियन बोलवतो. पण आता आम्ही तुम्हाला काही अशा टीप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही स्वत: तुमच्या Split AC मधून पाणी पडण्याची समस्या दूर करू शकता.
एअर फिल्टर स्वच्छ नसल्यामुळे एसीमधून पाणी गळतं. Split AC चे एअर फिल्टर दर २ ते ३ महिन्यांनी स्वच्छ करणं गरजेचं आहे. यामुळे फिल्टरमध्ये धूळ आणि घाण साचणार नाही आणि ड्रेनेज पाईपमधून पाणी सहज बाहेर पडेल. जर एअर फिल्टर खराब झाला असेल तर तो तात्काळ बदला. खराब झालेले फिल्टर एसीची क्षमता कमी करू शकतात आणि पाणी गळतीची समस्या वाढवू शकतात. अस्वच्छ एअर फिल्टरमुळे एसीमध्ये मोठा बिघाड देखील होऊ शकतो
Split AC ची ड्रेन लाइन स्वच्छ करा. त्यामुळे पाइपलाइनमध्ये साचलेली घाण दूर होऊन पाण्याचा मार्ग मोकळा होईल. ड्रेन लाइन अधिक काळ स्वच्छ राहण्यासाठी 6 महिन्यांतून एकदा पाण्यात व्हिनेगर ती स्वच्छ करा. यामुळे घाण साचण्यास प्रतिबंध होईल आणि ड्रेन लाइन स्वच्छ राहील.
Split AC च्या इनडोअर युनिटची पातळी योग्य स्तरावर निश्चित केली नसल्यास Split AC मधून पाणी पडतं. Split AC चे इनडोअर युनिट योग्य स्तरावर नसल्यास, ते योग्य स्तरावर सेट करा.
एसीमधील रेफ्रिजरंटची पातळी तपासा. रेफ्रिजरंटची पातळी कमी असल्यास, ते दुरुस्त करा. त्यामुळे तुमच्या Split AC मधून पाणी पडण्याची समस्या दूर होईल.