फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यास घाबरण्याची गरज नाही! या सोप्या पध्दतीने करू शकता रिस्टोअर
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता तुषार कपूरचे फेसबूक अकाऊंट आज 30 सप्टेंबर रोजी हॅक झाले आहे. याबाबत तुषार कपूरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्याने सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे सांगितलं आहे. यापूर्वी काशी विश्वनाथ मंदिराचे फेसबूक अकाऊंट हॅक झाले होते. सध्या हॅकींगच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सर्वसामान्यांसोबत कलाकारांचे अकाऊंट हॅक होण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
हेदेखील वाचा- Facebook वर आलं नवीन अपडेट! पोस्टला टॅग न करता हजारो व्ह्यूज आणि कमेंट्स
एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास किंवा एखाद्या संशयास्पद साईटवर लॉगिन केल्यास आपलं अकाऊंट हॅक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अकाऊंट हॅक झाल्याचे समजताच काहीजण प्रचंड काळजीत पडतात. पण फेसबूक अकाऊंट हॅक झाल्यास तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या पध्दती वापरून तुमचं अकाऊंट रिस्टोअर करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
तुमचे Facebook खाते हॅक झाले असल्यास, तुमच्या अकाऊंटवरून अनेकांना मॅसेज पाठवले जाऊ शकतात, जे तुम्ही पाठवले नसतील. तसेच Facebook अकाऊंटवरील अॅक्टिव्हिटीमध्ये देखील बदल पाहायला मिळतील. तुमचा प्रोफाईल फोटो बदलला असेल. तुमच्या प्रोफाईलवर अशा पोस्ट किंवा कमेंट्स पाहायला मिळतील ज्या तुम्ही केल्याच नाहीत. तुम्हाला अचानक लॉग इन करण्यात समस्या येत आहे किंवा तुमची नेहमीची टू-स्टेप वेरिफिकेशन पद्धत काम करत नाही, तर समजा की तुमचं फेसूबक अकाऊंट हॅक झालं आहे.
तुमच्या खात्यातून ईमेल ॲड्रेस किंवा मोबाइल नंबर जोडला किंवा काढून टाकला गेला आहे किंवा तुमचा पासवर्ड बदलला गेला आहे आणि तुम्ही तसे केले नाही याची माहिती देणारा तुम्हाला Facebook कडून ईमेल प्राप्त झाला असेल, तर हे अकाऊंट हॅक झाल्याचे संकेत आहेत.
हेदेखील वाचा- Ranveer Allahbadia सारखी चूक तुम्ही करू नका, तुमच्या YouTube चॅनलला अशा प्रकारे हॅकर्सपासून सुरक्षित ठेवा
प्रथम Facebook.com/hacked वर जा आणि फेसबुकला अलर्ट करा की तुमच्या अकाऊंटसोबत छेडछाड करण्यात आली आहे. आता तुम्हाला अकाऊंटशी संबंधित ईमेल पत्ता किंवा फोन नंबर प्रविष्ट करावा लागेल. Facebook.com/hacked वर जी काही माहिती विचारली असेल ती द्यावी. हे महत्त्वाचे आहे कारण यामुळे सिद्ध होते की तुम्ही अकाऊंटचे खरे मालक आहात.
यानंतर, आपल्या मित्रांशी संपर्क साधा. त्यांना कॉल करा आणि त्यांना सांगा की तुमचे खाते हॅक झाले आहे. तुमचे अकाऊंट हॅक झाल्याचे फेसबुकला कळवा. यासाठी More किंवा तीन डॉट मेनू > Find Support व Report वर क्लिक करा. आता फेसबूक तुमचे अकाऊंट परत मिळण्यासाठी प्रयत्न सुरु करेल. तुम्ही फेसबूकला जेवढ्या जास्त प्रमाणात माहिती द्याल तेवढं तुमचं अकाऊंट रिस्टोअर होण्याची जास्त शक्यता असते. या व्यतिरिक्त, जर तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकत असाल, तर तुम्ही तुमचे अकाऊंट तुमच्या व्यतिरिक्त कोणत्या ठिकाणी अॅक्टिव्ह केले आहे ते तपासू शकता. याबाबत फेसबुकच्या अकाउंट सेंटर पेजवर माहिती देऊ शकता.