Ranveer Allahbadia सारखी चूक तुम्ही करू नका, तुमच्या YouTube चॅनलला अशा प्रकारे हॅकर्सपासून सुरक्षित ठेवा
लोकप्रिय यूट्यूबर Ranveer Allahbadia 26 सप्टेंबर रोजी सायबर अटॅकचा बळी ठरला. 26 सप्टेंबर रोजी त्याचे दोन्ही यूट्यूब चॅनेल हॅक करण्यात आले. हॅकर्सनी दोन्ही चॅनेलची नावेही बदलली होती. Ranveer ने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत याबाबतच माहिती दिली होती. हॅकर्सनी युट्यूब चॅनेलची नावे Elon.trump.tesla_live2024 आणि Tesla.event.trump_2024 अशी ठेवली होती. तसेच या चॅनेलवरील सर्व व्हिडीओ देखील हटवण्यात आले होते. मात्र आता एक आनंदाची बातमी आहे. रणवीरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर यूट्यूब इंडिया आणि ग्लोबल टीमच्या मदतीने त्याचे युट्यूब चॅनेल परत मिळाल्याची घोषणा केली आहे.
हेदेखील वाचा- सायबर अटॅक! 19 रेल्वे स्थानकांचा वाय-फाय नेटवर्क झाला हॅक, तुम्हालाही महागात पडेल ही चूक
सोशल मीडिया अकाउंट किंवा युट्यूब चॅनेल हॅक होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहेत. नुकतेच ओपनएआय न्यूजरूमचे एक्स अकाऊंट देखील हॅक झाले होते. तर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनेल हॅक झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे आता आपलं युट्यूब चॅनेल हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवायचं असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही तुमच्या YouTube चॅनलला हॅकर्सपासून कसे सुरक्षित ठेवू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अनेबल करा: तुमच्या Google अकाऊंटवरील सेटिंग्जमध्ये जाऊन टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सेट करा. हे अतिरिक्त सुरक्षा स्तर प्रदान करते.
मजबूत पासवर्ड वापरा: एक मजबूत आणि अद्वितीय पासवर्ड तयार करा. यामध्ये अप्परकेस आणि लोअरकेस अक्षरे, संख्या आणि विशेष कॅरेक्टर्स देखील समाविष्ट असावेत.
अकाऊंट सुरक्षा: तुमच्या सर्व सोशल मीडिया आणि ईमेल खात्यांसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. आणि पासवर्ड नियमित बदलत राहा.
संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका: कोणत्याही अज्ञात किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा. या लिंक्समुळे तुमच्या खात्याची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.
हेदेखील वाचा- ॲप डिलीट केल्यानंतरही तुमचे डिटेल्स राहतात सेव्ह, सुरक्षेसाठी आताच फोनेमध्ये करा ही सेटिंग्ज
तुमचा ईमेल ॲड्रेस सुरक्षित ठेवा: तुमचे ईमेल खाते सुरक्षित असल्याची खात्री करा, कारण हॅकर्स अनेकदा तुमच्या ईमेला लक्ष करतात.
सुरक्षा माहिती अपडेट करा: तुमची खाते सुरक्षा माहिती वेळोवेळी अपडेट करा, जसे की मोबाइल नंबर आणि इतर डिटेल्स.
सुरक्षा सेटिंग्ज तपासा: नियमितपणे YouTube आणि Google च्या सुरक्षा सेटिंग्ज तपासा आणि आवश्यकतेनुसार ते अपडेट करा.
सॉफ्टवेअर सुरक्षित असल्याची खात्री करा: अँटीव्हायरस आणि अँटी-मालवेअर सॉफ्टवेअर वापरा आणि नियमितपणे स्कॅन करा. तसेच कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा, जरी ते ओळखीचे असले तरीही. तुमच्या खात्यासाठी रिकवरी पर्याय सेट करा, जसे की बॅकअप ईमेल किंवा फोन नंबर जेणेकरून एखादी समस्या उद्भवल्यास, तुम्ही त्याचे त्वरीत निराकरण करू शकता.