Facebook वर आलं नवीन अपडेट! (फोटो सौजन्य - pinterest)
सोशल मिडीया ॲप फेसबुकवर युजर्सची संख्या प्रचंड वाढत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेचजण फेसबुकचा वापर करतात. इतर सोशल मिडीया ॲप्सप्रमाणे फेसबुकवर देखील सतत काही ना काही नवीन अपडेट येत असते. आता फेसबुकवर असं अपडेट आलं आहे, ज्यामुळे सर्व युजर्स खुश होणार आहेत. फेसबुकच्या या नवीन अपडेटचा फायदा सर्व युजर्सना होणार आहे. आता कोणालाही टॅग न करता युजर्सना त्यांच्या पोस्टवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळणार आहेत.
हेदेखील वाचा- vivo V40 आणि V40 Pro ची आज होणार धमाकेदार एंट्री! जबरदस्त कॅमेऱ्यासह मिळणार भन्नाट फीचर्स
यापूर्वी लोकं फेसबुकवर केवळ वेगवेगळ्या प्रकारची पोस्ट करत होती. मात्र आता फेसबुक तुमचे विचार शेअर करण्याचा एक प्लॅटफॉर्म बनला आहे. लोक इतर प्लॅटफॉर्मऐवजी फेसबुकवर कोणत्याही विषयावर त्यांचे मत व्यक्त करणे, व्हिडिओ पोस्ट करणे इत्यादी पसंत करतात. तुम्ही तुमचे फोटो – व्हिडीओ शेअर करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी फेसबुकचा वापर करू शकता. स्टोरी शेअर करू शकता. आपण फेसबुकवर एखादा फोटो किंवा व्हिडीओ शेअर करतो, त्यावेळी जास्तीत जास्त लोकांना टॅग करतो, जेणेकरून आपल्या पोस्टवर खूप व्ह्युज आणि कमेंट्स मिळू शकतील. जास्तीत जास्त लोकांना आपल्या पोस्टमध्ये टॅग करण्याचा फायदा म्हणजे आपली पोस्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचते.
हेदेखील वाचा- UPI लाईट अनेक युजर्ससाठी ठरतय वरदान! कोणत्याही पिनशिवाय करू शकता झटपट पेमेंट
पण एवढ्या लोकांना आपल्या पोस्टमध्ये टॅग करणं सोपं काम नाही. यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो. पण समस्या अशी आहे की, आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं नाही तर आपली पोस्ट लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आता या सगळ्या समस्येवर उपाय म्हणून फेसबुकने नवीन अपडेट लाँच केलं आहे. या अपडेटमुळे आता आपल्याला लोकांना आपल्या पोस्टमध्ये टॅग करण्याची गरज नाही. टॅग न करता देखील आपण आपल्या पोस्टला हजारो व्ह्युज आणि कमेंट्स मिळवू शकतो.
फेसबुकवरील नवीन अपडेटच्या मदतीने तुम्ही कोणालाही टॅग न करता तुमची पोस्ट सर्वांना पाठवू शकता. तुम्हाला तुमच्या पोस्टवर हजारो कमेंट्स आणि व्ह्यूज मिळवायचे आहेत, तर फेसबुकचं हे नवीन अपडेट फार उपयोगी पडणार आहे. फेसबुकच्या नवीन अपडेटचा वापर करण्यासाठी तुम्हाला केवळ @ चिन्ह वापरावे लागणार आहे. या नवीन अपडेटमुळे युजर्सचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे. फेसबुकवरील नवीन अपडेटच्या मदतीने तुम्ही कोणालाही टॅग न करता तुमची पोस्ट सर्वांना पाठवू शकता.
फेसबुकचा नवीन अपडेट वापरण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा-