Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हालाही E-PAN Card डाउनलोड करण्यासाठी ई-मेल आला आहे आहे? मग सावध व्हा,होऊ शकते मोठी फसवणूक

E-PAN Card Download : ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्याच्या नावाखाली हॅकर्स तुमची फसवणूक करू शकतात. पीआयबी फॅक्ट चेकने अशा बनावट ई-मेल्सबद्दल लोकांना सावध केले आहे आणि ते टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 27, 2024 | 08:59 AM
तुम्हालाही E-PAN Card डाउनलोड करण्यासाठी ई-मेल आला आहे आहे? मग सावध व्हा,होऊ शकते मोठी फसवणूक

तुम्हालाही E-PAN Card डाउनलोड करण्यासाठी ई-मेल आला आहे आहे? मग सावध व्हा,होऊ शकते मोठी फसवणूक

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या या डिजिटल जगात आपले पॅन कार्ड हे आपले एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आजकाल कोणत्याही पर्सनल किंवा प्रोफेशनल कामासाठी आपल्याला आपल्या पॅन कार्डची गरज भासते. अशात या कागतपत्राची योग्य रीतीने काळजी घेणे फार गरजेचे आहे. नुकताच फसवणुकीचा एक नवीन मार्ग समोर आला आहे. यात घोटाळेबाज पॅन कार्ड डाउनलोड करण्याचा बनावटी ई-मेल पाठवून तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करतात. तुम्हालाही असा काही ई-मेल आला असेल तर वेळीच सावध व्हा.

सरकारने अलीकडेच पॅन कार्ड 2.0 ची घोषणा केली आहे, ज्यामध्ये युजर्सना QR कोड बेस पॅन कार्ड जारी केले जाईल. पॅन कार्ड 2.0 ची घोषणा झाल्यानंतर लोक इंटरनेटवर पॅन कार्डशी संबंधित माहिती शोधत आहेत. याचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत आहेत. स्मार्टफोन्सच्या आगमनानंतर, लोक त्यांचे महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स डिजिटल स्वरूपात ठेवतात, जेणेकरुन जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते दाखवता येतील. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून ई-पॅन कार्ड डाउनलोडच्या नावाने येणाऱ्या ई-मेल्सबाबत सावध राहण्यास सांगितले आहे. आज आपण या लेखात याविषयीच काही सविस्तर बाबी जाणून घेणार आहोत.

Google Maps च्या या फीचरने सॉल्व्ह केली मोठी मर्डर मिस्ट्री, जाणून घ्या कसा वापरायचा

फॅक्ट चेक टीमने सांगितले की, हॅकर्सनी अनेक यूजर्सना ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी ई-मेल पाठवले आहेत. हा बनावट ई-मेल असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. हॅकर्स लोकांना बनावट लिंक पाठवून त्यांची सायबर फसवणूक करत आहेत. तुम्हालाही असा कोणताही ई-मेल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲप मेसेज आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा कारण ते खोटे आहे आणि हॅकर्सनी तुमची पर्सनल माहिती चोरण्यासाठी पाठवले आहे.

अशा लिंक्स पाठवून, गुन्हेगार नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार कार्ड क्रमांक आणि अगदी बँक डिटेल्स यांसारखी पर्सनल माहिती चोरतात. हॅकर्सपर्यंत माहिती पोहोचल्यानंतर युजर्सची फसवणूक होऊ शकते. ई-मेल किंवा एसएमएसमध्ये पाठवलेल्या अशा लिंकमध्ये व्हायरस असू शकतात, जे तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरमध्ये घुसू शकतात. तुमच्या पर्सनल माहितीसोबतच तुमची पर्सनल कागदपत्रे, फोटो आदींचीही चोरी होऊ शकते.

WhatsApp ने जारी केला कामाचा फिचर, आता थेट कॅमेऱ्यातून स्कॅन होतील कागदपत्रे

पॅन कार्ड कोठून डाउनलोड करायचा?

पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत आयकर (Income tax) वेबसाइटला भेट देऊ शकता. तेथे तुम्हाला ई-पॅन कार्डचा पर्याय मिळेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. याशिवाय डिजीलॉकरवर (Digilocker) तुम्ही तुमच्या पॅन कार्डचे डिजिटल व्हर्जन चेक करू शकता

Web Title: E pan card emal scam govt warns users check how to prevent yourself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 08:59 AM

Topics:  

  • pan card

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.