Google आणि Microsoft ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच होणार नवं सर्च इंजिन, या कंपन्यांची घोषणा
गुगल आणि मायक्रोसॉफ्ट हे सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहेत. गुगल आणि मायक्रोसॉफ्टवर आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. तसेच या सर्च इंजिनवर विविध प्रकारची माहिती देखील उपलब्ध आहे. आता गुगल आणि मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्यासाठी लवकरच एक नविन सर्च इंजिन लाँच होणार आहे. याबाबत इकोसिया आणि क्वांट या सर्च इंजिनने घोषणा केली आहे. इकोसिया आणि क्वांट हे दोन्ही सर्च इंजिन इंडिपेंडेंट यूरोपियन सर्च इंडेक्स लाँच करण्याच्या तयारीत व्यस्त आहेत.
हेदेखील वाचा- Chrome यूजर्ससाठी धोक्याची घंटा! सरकारने जारी केली चेतावणी, अनेक वर्जनमध्ये सिक्योरिटी रिस्क
इकोसिया आणि क्वांट लवकरच गुगल आणि मायक्रोसॉफ्टला टक्कर देणार आहेत. इकोसिया आणि क्वांट तयार करत असलेल्या सर्च इंजिनचं नाव यूरोपियन सर्च पर्सपेक्टिव (EUSP) असं आहे. फ्रेंच आणि जर्मन भाषेत चांगले सर्च रिझल्ट देण्यासाठी यूरोपियन सर्च पर्सपेक्टिव लाँच केलं जाणार आहे. 2025 च्या सुरुवातीला हे नवीन सर्च इंजिन फ्रान्समध्ये लाँच होणं अपेक्षित आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
सर्च इंजिन इकोसिया हे जर्मनीमध्ये आहे, तर क्वांट सर्च इंजिन फ्रान्समध्ये आहे. CNBC च्या अहवालानुसार, गुगल आणि मायक्रोसॉफ्टवर अवलंबून राहिल्यामुळे सर्च इंजिन्सना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. याच गोष्टींचा विचार करता आता नवीन सर्च इंजिन लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
क्वांट आणि इकोसियाने सस्टेनेबिलिटी आणि प्राइवेसीवर लक्ष केंद्रित करून स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. क्वांट हे एक प्राइवेसी-फोकस्ड सर्च इंजन आहे जे यूजर्सना ट्रॅक करत नाही किंवा त्यांचा वैयक्तिक डेटा विकत नाही, तर इकोसिया सस्टेनेबिलिटीवर लक्ष केंद्रित करते.
हेदेखील वाचा- Jiostar Coming Soon! नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओच्या अडचणी वाढल्या, लवकरच लाँच होणार नाव ॲप
क्वांट आणि इकोसिया या कंपन्या मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी तयार केलेल्या पायाभूत सुविधांवर अवलंबून आहेत. परंतु आता EUSP ज्वॉइंट वेंचरचा उद्देश मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या टेक कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करणं आणि एक इंडिपेंडेंट यूरोपियन सर्च इंडेक्स लाँच करणं असं आहे. हे इंडेक्स विविध सर्च इंजनच्या रिझल्ट्सना एकत्र करेल, युजर्सच्या प्रायव्हसीला प्राधान्य देईल आणि क्वांटच्या रीडिजाइन्ड प्राइवेसी-फोकस्ड टेक्नोलॉजीचा वापर करेल.
क्वांटचे सीईओ ऑलिव्हियर अबाकॅसिस यांनी सांगितलं की, गुगल आणि मायक्रोसॉफ्टला टक्कर देण्यासाठी लवकरच एक नविन सर्च लाँच होणार आहे. यूरोपियन सर्च पर्सपेक्टिव (EUSP) असं या नवीन सर्च इंजिनचं नाव असणार आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी तयार केलेल्या पायाभूत सुविधांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.