Jiostar Coming Soon! नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओच्या अडचणी वाढल्या, लवकरच लाँच होणार नाव ॲप
Reliance Jio आणि Disney + Hotstar यांच्यातील करार निश्चित झाला आहे. रिपोर्टनुसार, कंपनी जिओ सिनेमा आणि Disney Plus Hotstar ची जाहिरात करण्यासाठी नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी पुढे काय करणार आहे याबद्दल लोकांना अजूनही उत्सुकता आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून जिओ आणि Disney Plus Hotstar यांच्यातील नव्या डोमेनबाबत वाद सुरू होता. जिओ आणि Disney यांच्या मिलनिकरणानंतर त्यांचं नवीन डोमेन JioHotstar असेल असं अनेकांना वाटल होतं.
हेदेखील वाचा- Jio आणि Disney+ Hotstar साठी JioHotstar डोमेनचा मार्ग मोकळा? जैनम आणि जीविका मोफत डोमेन देण्यास तयार!
सुरुवातीला असे मानले जात होते की नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव Jio Hotstar असेल. या डोमेन नावामागेही बराच वाद सुरू होता. मात्र आता ‘JioStar’ नावाची नवीन वेबसाइट लाइव्ह झाली आहे, ज्यावरून असे दिसून येते की हे नाव नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी रिलायन्सने हे नाव अंतिम केले आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
JioStar नावाची नवीन वेबसाइट लाइव्ह झाली आहे. हे डोमेन ओपन केल्यानंतर ‘कमिंग सून’ अशी टॅगलाइन दिसते. यावरून रिलायन्सने नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करण्याची तयारी केल्याचे दिसून येते. जिओने अद्याप नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मची अधिकृत घोषणा केली नसली तरी Disney सोबत विलीनीकरण झाल्यानंतर त्यावर काम वेगाने सुरू आहे.
रिपोर्टनुसार, रिलायन्स-Disney विलीनीकरण पूर्ण झाले आहे. सध्या, जियोने नविन ओटीटी प्लॅटफॉर्मची लाँच तारीख जाहीर केलेली नाही. नवीन JioStar ओटीटी प्लॅटफॉर्म JioCinema आणि Disney+ Hotstar यांना एका युनिटमध्ये विलीन करेल. या वर्षाच्या सुरुवातीला, Jio Cinema ची सुधारणा करण्यात आली आणि Voot मधील सामग्रीसह नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून लाँच करण्यात आलं. गेम ऑफ थ्रोन्स, द लास्ट ऑफ अस, सक्सेशन आणि हाऊस ऑफ द ड्रॅगन यासारख्या सामग्री एकाच प्लॅटफॉर्मवर ऑफर करणे हे जिओ सिनेमाचे ध्येय होते.
हेदेखील वाचा- JioHotstar डोमेन मध्ये नवा ट्विस्ट, UAE भाऊ-बहीणने केला मालक असल्याचा दावा; खरा मालक नक्की कोण?
रिलायन्स जर ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून JioStar लाँच करण्याची योजना आखत असेल, तर ती आधीपासून अस्तित्वात असलेल्या नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओशी स्पर्धा करेल. JioStar मुळे नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओला नवा स्पर्धक मिळणार आहे.
अलीकडे, दुबईस्थित भावंड जैनम आणि जीविका यांनी JioHotstar डोमेन विनामूल्य रिलीझ करण्याची ऑफर रिलायन्सल दिली होती. याआधी दिल्लीतील एका डेव्हलपरने या डोमेनसाठी 1 कोटी रुपये मागितले होते, परंतु आता रिलायन्सने या डोमेनला मागे टाकून नवीन नावाने ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करण्याची तयारी केली आहे.
जैनम आणि जीविका यांनी सांगितलं होतं की, दिल्लीस्थित ॲप डेव्हलपरला मदत करण्यासाठी आम्ही डोमेन विकत घेतले. यामागे पैसे कमवायचे आमचा कोणताही हेतू नव्हता. जर रिलायन्सला JioHotstar डोमेन विकत घ्यायचे असेल तर आम्ही हे डोमेन विनामूल्य देण्यासाठी तयार आहोत.