
फोटो सौजन्य - Social Media
या DJI Neo 2 ड्रोन कॅमेरामध्ये १२ मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच 1/2-inch CMOS (complementary metal oxide semiconductor) सेन्सर वापरण्यात आला आहे. हा सेन्सर अंतर्गत प्रकाशाला डिजिटल इमेजमध्ये टर्न करण्याचे काम करते. तसेच या ड्रोन कॅमेरात f/2.2 अपर्चर वापरण्यात आले आहे, जे उत्कृष्ट्य रित्या कामे करते. यात महत्वाचे म्हणजे नवीन 2-axis गिंबल वापरण्यात आले आहे जेणेकरून फुटेज जास्त स्थिर येतील. या ड्रोन कॅमेरातून 4K व्हिडिओ @ 100fps पर्यंत व्हिडीओ काढू शकता.
DJI Neo 2 मधून स्लो मोशन फुटेज आणखीन चांगल्या पद्धतीने काढता येतात. या कॅमेरात 2.7K Vertical Video रेकॉर्डिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच हा कॅमेरा DJI Motion Controller + FPV Goggles सह काम करतो. व्हिडीओ शूटिंग आणि ट्रेकिंग विषयी पाहिलात तर यात ActiveTrack + Selfie Shots अतिशय उत्तम दर्जाचे आहेत. तर ओपन स्पेसमध्ये 12 m/s वेगाने ट्रॅकिंग प्रणाली देण्यात आली आहे. तसेच हा कॅमेरा तिरप्या दिशेनेही फिरू शकतो. कॅमेराला साईड डिस्पले देण्यात आली आहे.
मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जैसे हातवारे कराल तसा कॅमेरा उडेल. डाव्या बाजूला हात वळवा, कॅमेरा डाव्या बाजूला जाईल तर उजव्या बाजूला हात वलवाल तर कॅमेरा उजव्या बाजूला उडेल. Smartphone / Bluetooth Earphones द्वारे व्हॉइस कमांडही कॅमेरा देण्यात येतो तर लांब पल्ल्यासाठी DJI RC-N3 Controller सपोर्ट देण्यात आले आहे. Dolly Zoom, Quick Shots, Master Shots, Dronie, Circle, Rocket, Spotlight, Helix आणि Boomerang प्रीसेट्स असे विविध क्रिएटिव्ह शूटिंग मोडस देण्यात आले आहे. आणि सुरक्षितता म्हणून All-direction Monocular Vision, Forward LiDAR Sensor तसेच Downward Infrared Sensor, DJI Neo 2 या कॅमेरात देण्यात आले आहे.