फ्लॅगशिप Samsung Galaxy S25 सिरीज लवकरच होणार लाँँच, सॅमसंगने केली घोषणा! वाचा फीचर्स
स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने त्याच्या आगामी फ्लॅगशिप सिरीजची घोषणा केली आहे. सॅमसंगने त्याच्या आगामी Galaxy S25 सीरीज लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की ते 2025 च्या सुरुवातीला Samsung Galaxy S25 सिरीज लाँंच केली जाईल. यासोबतच कंपनीने म्हटले आहे की लवकरच स्मार्ट ग्लासेस XR डिवाइस देखील लाँँच केलं जाणार आहे. शिवाय कंपनी 2025 मध्ये आपला स्वस्त फोल्डेबल फोन देखील लाँच करणार आहे.
हेदेखील वाचा- टेक जायंट गुगल खास पध्दतीने साजरी करतोय दिवाळी, लाँंच केले तीन सिक्रेट गेम्स! आत्ताच ट्राय करा
सॅमसंगने 2025 मध्ये लाँंच होणाऱ्या डिव्हाईसचे टीझर रिलीज करणं सुरु केलं आहे. कंपनी लवकरच आपली फ्लॅगशिप Samsung Galaxy S25 सीरीज तसेच स्मार्ट ग्लासेस XR डिवाइस बाजारात लाँच करणार आहे. यासोबतच कंपनी बजेट फ्रेंडली फोल्डेबल स्मार्टफोन देखील लाँच करण्याचा विचार करत आहे. सॅमसंगने आपल्या अधिकृत दक्षिण कोरिया वेबसाइटच्या न्यूजरूममध्ये एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
सॅमसंगने Galaxy S25 मालिका लाँच करण्याची पुष्टी केली आहे. सॅमसंगने अधिकृतपणे जाहीर केलं आहे की ते 2025 च्या पहिल्या सहामाहीत Galaxy S25 सिरीज लाँच करेल. हे सर्वाना माहीत असले तरी कंपनीने आतापर्यंत याची अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र आता कंपनीकडून यासंबंधित अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सॅमसंगने या वर्षी जानेवारीमध्ये Galaxy S24 सीरीज लाँच केली होती. अशी अपेक्षा आहे की कंपनी त्याच टाइमलाइनमध्ये Galaxy S25 लाइनअप देखील लाँच करेल. सॅमसंगची आगामी स्मार्टफोन मालिका प्रगत Galaxy AI वैशिष्ट्याला सपोर्ट करेल.
कंपनीने स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. सॅमसंगच्या या बजेट फ्रेंडली फोल्डेबल फोनची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती. कंपनीने आतापर्यंत प्रीमियम रेंजमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने आतापर्यंत फोल्डेबल फोनच्या 5 जनरेशन लाँच केल्या आहेत आणि फोल्डेबल स्मार्टफोन अजूनही मेनस्ट्रीमचा भाग बनलेले नाहीत. आता परवडणाऱ्या फोल्डेबलसह, कंपनीला फोल्डेबल तंत्रज्ञान सर्व वापरकर्त्यांसाठी सुलभ बनवायचे आहे.
हेदेखील वाचा- Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro स्मार्टफोन सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या<%