Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro स्मार्टफोन सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
लोकप्रिय टेक कंपनी Xiaomi ने त्यांची नवीनतम स्मार्टफोन सिरीज Xiaomi 15 चीनमध्ये लाँच केली आहे. सर्वात शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 8 Elite चिपसेटसह ही सिरीज लाँच करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro हे स्मार्टफोन लाँच केले आहेत. या स्मार्टफोनची विक्री 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. Xiaomi 14 सिरीजच्या तुलनेत, अपग्रेड केलेला कॅमेरा सेटअप मोठ्या बॅटरी आणि वेगवान चिपसेटसह नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- OpenAI ने रोलआऊट केलं नवं फीचर, आता ChatGPT मध्ये मिळणार हिस्ट्रीमधून सर्च करण्याचं ऑप्शन
Xiaomi 15 सिरीज चीनच्या होम मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. Xiaomi ची ही सिरीज Qualcomm च्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Elite चिपसेटसह लाँच केलेला पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीने या सीरीजचे दोन स्मार्टफोन Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro लाँच केले आहेत. क्वालकॉमचा नवीनतम चिपसेट दोन्ही फोनमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
यासह, कंपनीने Xiaomi 14 सिरीजच्या तुलनेत अपग्रेड कॅमेरा सेटअप, मोठी बॅटरी आणि वेगवान चिपसेटसह आपली नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. या स्मार्टफोन सिरीजच्या फीचर्स आणि किंमतीवर नजर टाकूया.
Xiaomi 15 स्मार्टफोन चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Xiaomi चा हा फोन CNY 4,499 म्हणजेच सुमारे 52,994 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह लाँच करण्यात आला आहे. Xiaomi 15 Pro स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याचा बेस व्हेरिएंट 12GB रॅम + 256GB स्टोरेजसह येतो. हा फोन CNY 5,499 म्हणजेच अंदाजे 64.916 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. Xiaomi 15 सिरीजची विक्री चीनमध्ये 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
हेदेखील वाचा- Diwali Celebration 2024: दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी पर्याय शोधताय? या उत्तम स्मार्टफोन ॲक्सेसरीज तुमची नक्की मदत करतील
डिस्प्ले: Xiaomi 15 स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.36-इंच 1.5K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासह, प्रो मॉडेलमध्ये 6.73-इंचाचा 2K मायक्रो-कर्व्ड डिस्प्ले आहे. दोन्ही फोनच्या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 3,200 निट्स आहे. यामध्ये कस्टमाइज्ड ल्युमिनस M9 मटेरियल वापरण्यात आले आहे, जे वीज वापर 10 टक्क्यांनी कमी करते.
प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: Xiaomi च्या दोन्ही फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर आहे. या सीरीजचे दोन्ही फोन 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज पर्यंत सपोर्ट करतात.
कॅमेरा सेटअप: Xiaomi 15 स्मार्टफोनमध्ये 50MP LightHunter 900 प्रायमरी कॅमेरा लेन्स आहे, त्यासोबत 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP 3.2x टेलीफोटो लेन्स उपलब्ध आहेत. या फोनमध्ये सेल्फीसाठी 32MP OmniVision OV32B40 फ्रंट कॅमेरा आहे. Xiaomi 15 Pro बद्दल बोलायचे झाले तर, यात 50MP लाइट हंटर 900 प्राइमरी कॅमेरा लेन्स आहे, ज्यासोबत 50MP Samsung JN1 अल्ट्रा-वाइड कॅमेरा प्रदान केला आहे. यासोबतच फोनमध्ये 50MP Sony IMX858 5X पेरिस्कोप लेन्स आहे. या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी आणि चार्जिंग: Xiaomi 15 स्मार्टफोनमध्ये 90W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,400mAh बॅटरी आहे. प्रो मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर यात 6,100mAh बॅटरी आहे. त्याची चार्जिंग गती व्हॅनिला व्हेरियंट सारखीच राहील.
सॉफ्टवेअर आणि इतर फीचर्स: Xiaomi चे दोन्ही स्मार्टफोन Android 15 वर आधारित HyperOS 2.0 वर चालतील. यासोबतच धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी फोनमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP68 रेटिंग आहे.