Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Big Billion Days Sale 2024: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये लॅपटॉपवर मिळणार भरगोस डिस्काऊंट

तुम्ही सुद्धा नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Flipkart Big Billion Days Sale 2024 हा 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या सेलमध्मे तुम्हाला लॅपटॉपच्या खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळणारं आहे. ASUS Vivobook 15 ची किंमत 69,990 रुपये आहे, परंतु ऑफरनंतर हा लॅपटॉप 36,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2024 | 09:00 PM
Flipkart Big Billion Days Sale 2024: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये लॅपटॉपवर मिळणार भरगोस डिस्काऊंट

Flipkart Big Billion Days Sale 2024: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये लॅपटॉपवर मिळणार भरगोस डिस्काऊंट

Follow Us
Close
Follow Us:

लॅपटॉप काळाची गरज बनली आहे. विद्यार्थी असो किंवा कर्मचारी प्रतेकासाठी लॅपटॉप कम्पल्सरी झाला आहे. ऑफिसची काम असो नाही तर कॉलेजचे प्रोजेक्ट्स सर्व कामांसाठी आपल्याला लॅपटॉपची गरज भासते. डेटा तयार करणे, प्रकल्पांची रूपरेषा तयार करणे, ऑनलाइन क्लासेस अटेंड करण ही सर्व काम लॅपटॉपच्या मदतीने अगदी सहज शक्य होतात. पण लॅपटॉपची किंमत इतकी जास्त असते, की तो घेणं प्रत्येकाला शकत नसत.

हेदेखील वाचा- Myntra Fashion Festival: खरेदीसाठी तयार आहात का? सुरु होतोय Myntra Fashion Festival, कपडे, शूज, घड्याळावर जबरदस्त डिस्काऊंट

तुम्ही सुद्धा नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात पण लॅपटॉपच्या प्रचंड किंमतीमुळे थांबला आहात. तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दोन दिवसांतच फ्लिपकार्टच बिग बिलियन डे सेल सुरू होणार आहे. या सेलमध्मे तुम्हाला लॅपटॉपच्या खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळणारं आहे. त्यामुळे तुम्ही अगदी कमी किंमतीत तुमच्या आवडत्या ब्रँडच्या लॅपटॉपची खरेदी करू शकणार आहात.

ASUS Vivobook 15

ASUS त्याच्या उत्कृष्ट लॅपटॉपसाठी ओळखले जाते. ASUS Vivobook 15 हा Intel i5 लॅपटॉप आहे, परंतु तुम्ही तो Intel i3 च्या किमतीत खरेदी करू शकता. यामध्ये Intel Core i5 12th Gen, 8GB RAM आणि 512GB SSD आहे. यामध्ये 15.6-इंच डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप निळा आणि कूल सिल्व्हर अशा दोन रंगात उपलब्ध आहे. त्याची किंमत 69,990 रुपये आहे, परंतु ऑफरनंतर हा लॅपटॉप 36,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर तुम्ही 6 महिन्यांचा विनाखर्च EMI घेऊ शकता. याशिवाय, जुन्या लॅपटॉपच्या एक्सचेंजवर 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते.

Chromebook Plus

Chromebook Plus हा एक शक्तिशाली AI लॅपटॉप आहे, जो Google द्वारे डिझाइन केलेले ChromeOS (ऑपरेटिंग सिस्टम) सह येतो. यात टायटन सी सिक्युरिटी चिपसह सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यात 128GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे, जे तुमच्या ॲप्स, फोटो आणि फाइल्ससाठी पुरेसे आहे. 1080p IPS डिस्प्लेसह, त्याची किंमत 49,990 रुपये आहे. परंतु सेलमध्ये हा लॅपटॉप 21,490 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

हेदेखील वाचा- OTP म्हणजे नक्की आहे तरी काय? जास्तीत जास्त किती वेळ करू शकता OTP चा वापर? जाणून घ्या

Acer Swift Go 14

तुम्ही Acer ब्रँडचा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Acer Swift Go 14 चा विचार करू शकता. हे Intel EVO Core i5 13th Gen प्रोसेसरसह येते. यात 16GB रॅम आणि 512GB SSD आहे, जे परफॉर्मन्स वाढवते. OLED डिस्प्लेसह, यात प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत. 9 महिने विनाखर्च EMI आणि एक्सचेंज ऑफरवर अतिरिक्त सवलत सह, त्याची किंमत 93,999 रुपये आहे, परंतु तुम्ही सेलमध्ये हा लॅपटॉप 49,990 रुपयांना खरेदी करू शकता.

HP Pavilion

HP Pavilion मध्ये 15.6 इंच FHD डिस्प्ले, बॅकलिट कीबोर्ड, B&O ऑडिओ, प्री-इंस्टॉल केलेले MS Office, आणि इंटिग्रेटेड इंटेल आयरिस Xe ग्राफिक्स आहे. यात नवीनतम Intel Core i5 13th Gen प्रोसेसर, 16GB RAM आणि 512GB SSD आहे. HP Pavilion ची किंमत 83,705 आहे. परंतु तुम्ही हा लॅपटॉप 55,990 रुपयांना खरेदी करू शकता.

Samsung Galaxy Book4

Samsung Galaxy Book4 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे Intel Core i5 13th Gen प्रोसेसर. हा लॅपटॉप 8GB रॅम आणि 16GB रॅममध्ये उपलब्ध आहे. Intel Core i5 सेगमेंटमध्ये हा लॅपटॉप हलका आणि पातळ आहे. यात 15.6 इंच FHD डिस्प्ले, स्टायलिश ॲल्युमिनियम बॉडी, डॉल्बी ॲटमॉस स्पीकर आणि सॅमसंग इकोसिस्टमसह सुलभ कनेक्टिव्हिटी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. त्याची किंमत 78,189 रुपये असली तरी सेलमध्ये त्याची किंमत 49,990 रुपये आहे.

Lenovo IdeaPad Slim 3

Lenovo IdeaPad Slim 3 मध्ये Intel Core i5 12th Gen प्रोसेसर, 14 इंचाचा FHD IPS डिस्प्ले, 250 nits ब्राइटनेस, बॅकलिट कीबोर्ड आणि प्री-इंस्टॉल केलेले MS Office आहे. 8GB RAM आणि 512GB SSD सह येणारा, हा लॅपटॉप यावर्षी सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. त्याची किंमत 59,990 रुपये आहे, परंतु ऑफरनंतर त्याची किंमत 38,990 रुपये झाली आहे.

Web Title: Flipkart big billion days sale 2024 you will get bumper offers on laptop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 09:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.