TRAI च्या नावे केले जात आहेत फ्रॉड कॉल्स; टेलिकॉम अधिकाऱ्यांनी दिला सतर्कतेचा इशारा (फोटो सौजन्य - pinterest)
फ्रॉड कॉल्स आणि फ्रॉड मॅसेजने होणाऱ्या फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. स्कॅमर्स कधी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे तर कधी बँके अधिकाऱ्यांच्या नावे सामान्य नागरिकांना फोन करतात आणि त्यांची फसवणूक करतात. सध्या ह्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पोलीस किंवा बँक अधिकाऱ्यांची नाव ऐकूण सामान्य नागरिक स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात. सध्या स्कॅमर्स सामान्य नागरिकांना TRAI अधिकाऱ्यांच्या नावाने फोन करत आहेत. याबाबत स्वत: टेलिकॉम अधिकाऱ्यांनी माहिती देत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
हेदेखील वाचा-1 सप्टेंबरपासून लागू होणार TRAI चा नवा नियम, एक चूक आणि सिमकार्ड होऊ शकतं बंद
स्कॅमर TRAI च्या नावाने ग्राहकांना फसवणूक करणारे कॉल करत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता टेलिकॉम अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. टेलिकॉम अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, स्कॅमर तुमचे मोबाईल कनेक्शन तोडण्याची आणि तुमची वैयक्तिक माहिती मागण्याची धमकी देतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांच्या जाळ्यात पडलात तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागू शकते. स्कॅमर लोकांना फसवण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. स्कॅमर ग्राहकांना कॉल करून, नंबर बंद करण्याची धमकी देत आहेत. TRAI च्या नावाने केल्या जाणाऱ्या फसव्या कॉलला बळी पडू नका, असं आवाहन टेलिकॉम अधिकाऱ्यांनी केलं आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने स्पष्ट केले की ते मेसेज किंवा इतर माध्यमांद्वारे मोबाईल नंबर डिस्कनेक्ट करण्याबद्दल ग्राहकांशी संवाद साधत नाही किंवा त्यांनी कोणत्याही थर्ड पार्टी एजन्सीला तसे करण्यास अधिकृत केले नाही. त्यामुळे, TRAI कडून दावा करणारा आणि मोबाईल नंबर डिस्कनेक्ट करण्याची धमकी देणारा कोणताही कॉल किंवा संदेश हा संभाव्य फसवणूकीचा प्रयत्न मानला जावा. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि संशयित फसवणूक करणाऱ्यांना घाबरू नका किंवा त्यांना बळी पडू नका, असे TRAI ने म्हटलं आहे.
हेदेखील वाचा-कॉलरची ओळख जाणून घेण्यासाठी आता थर्ड पार्टी ॲपची गरज नाही; लवकरच ‘ही’ सेवा सक्रीय होणार
TRAI कडून असल्याचा दावा करणाऱ्या नागरिकांना अनेक प्री-रेकॉर्ड केलेले कॉल ऐकवले जात आहेत, जेथे युजर्सना त्यांचे नंबर लवकरच ब्लॉक केले जातील अशी धमकी दिली जाते आणि त्यांची वैयक्तिक माहिती विचारली जाते. त्यामुळे असे कॉल आल्यास अधिकृत कॉल सेंटर किंवा कस्टमर केअर सेंटरशी संपर्क साधावा. फसवणूकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी TRAI कठोर पावलं उचलतं आहे
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने देशभरात कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सेवा लागू करण्याचे आदेश दिले आहेत. कॉलिंग नेम प्रेझेंटेशनच्या मदतीने तुम्हाला कॉलरचे नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. यामुळे कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय तुम्ही कॉलरची ओळख जाणून घेऊ शकता. स्पॅम कॉलची वााढती समस्या लक्षात घेता TRAI ने काही नियम जारी केले आहेत. हे नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.