1 सप्टेंबरपासून लागू होणार TRAI चा नवा नियम (फोटो सौजन्य- pinterest)
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सध्या फसवूणकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलत आहे. स्पॅम कॉलची वााढती समस्या लक्षात घेता TRAI ने काही नियम जारी केले आहेत. हे नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. या नवीन नियमानुसार, जर कोणी खाजगी मोबाईल नंबरवरून टेलिमार्केटिंग कॉल करत असेल तर टेलिकॉम ऑपरेटर्सना त्याच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. स्पॅम कॉलद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी TRAI ने हे नवीन नियम जारी केले आहेत. त्यामुळे आता नागरिकांची एक चूक त्याचं सिमकार्ड बंद करू शकते.
हेदेखील वाचा- TRAI चे नियम टेलिकॉम कंपन्यांसाठी ठरले डोकेदुखी! नव्या नियमांवर COAI नाराज
सध्या स्पॅम कॉलच्या नावाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरु आहे. स्पॅम कॉलद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकार दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे. आता सरकारच्या या प्रयत्नांना TRAI ने देखील साथ दिली आहे. स्पॅम कॉलद्वारे नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी TRAI ने काही नियम जारी केले आहेत. TRAI ने जारी केलेला हा नियम 1 सप्टेंबर 2024 पासून लागू होणार आहे. सरकारने देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांना देखील सूचना जारी केल्या आहेत. नवीन नियमांबाबत TRAI ने आपल्या अधिकृत X हँडलवर अपडेट जारी केलं आहे.
TRAI च्या नवीन नियमानुसार, सरकारकडे स्पॅम कॉलच्या नावाखाली सतत फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. हे लक्षात घेऊन नवा नियम जारी करण्यात आला आहे. जर कोणी खाजगी मोबाईल नंबरवरून टेलिमार्केटिंग कॉल केला तर तो नंबर टेलिकॉम ऑपरेटर्सद्वारे 2 वर्षांसाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाईल. सरकारने टेलीमार्केटिंग संदर्भात एक नवीन मोबाईल नंबर सिरीज जारी केली आहे. आता बँकिंग आणि विमा क्षेत्राला 160 क्रमांकाच्या सिरीजमधूनच प्रमोशनल कॉल आणि मॅसेज करावे लागणार आहेत.
हेदेखील वाचा- टेलिकॉम कंपन्यांचे पूर्वीचे रिचार्ज प्लॅन पुन्हा सुरु होणार? TRAI मे मांडला एक खास प्रस्ताव
TRAI चा नवीन नियम लागू झाल्यानंतर लोकांना नको स्पॅम कॉल आणि मेसेजचा सामना करावा लागणार नाही. नवीन नियमात ऑटोमॅटिक जनरेटेड कॉल्स/रोबोटिक कॉल्स आणि मॅसेज देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. TRAI च्या या ॲक्शन प्लॅननंतर स्पॅम कॉल आणि मॅसेजवर बंदी घातली जाईल. दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 3 महिन्यांत नागरिकांना 10 हजारांहून अधिक फसवणूकीचे संदेश पाठवण्यात आले आहेत. यामुळे सरकारने फसवणूक आणि स्पॅम कॉल्सबाबत कठोर भूमिका घेतली आहे.
तुम्हाला असा कोणताही स्पॅम कॉल किंवा मॅसेज आल्यास तुम्ही तात्काळ ‘संचार साथी पोर्टल’वर तक्रार करू शकता. तुम्ही तुमची तक्रार 1909 वर देखील नोंदवू शकता. आता सरकारच्या या नव्या नियमाचा टेलिकॉम ऑपरेटर्स आणि स्पॅम कॉल करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. TRAI च्या नियमांनुसार, 1 सप्टेंबर 2024 पासून, URL/APK असलेला कोणताही संदेश वितरित करण्याची परवानगी दिली जाणार नाही, ज्यामध्ये URL/APK वाइट लिस्टेड नसेल.