गेमर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात पुन्हा होणार Free Fire ची एंट्री, या दिवशी सुरु होणार पहिले स्पोर्ट्स टूर्नामेंट
सर्व मोबाईल गेमरसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात बॅन करण्यात आलेला फ्री फायर आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. 2022 मध्ये भारतात फ्री फायर बॅन करण्यात आला होता. मात्र आता या गेमची पुन्हा एकदा भारतात एंट्री होणार आहे आणि याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षांपासून फ्री फायरच्या भारतातील एंट्रीबाबत अनेक अफवा सुरू होत्या, मात्र आता अखेर या गेमच्या परतण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गेम डेवलपर Garena द्वारे सोशल मीडियाद्वारे गेमच्या री-लाँचची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने शेअर केलेली ही माहिती मोबाईल गेमिंग प्रेमीसाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आहे.
सुमारे 3.5 वर्षानंतर फ्री फायर भारतात पुन्हा एकदा धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. फ्री फायरच्या या पुनरागमनासोबत एक भव्य स्पोर्ट्स टूर्नामेंट देखील आयोजित केली जाणार आहे. Free Fire Max India Cup 2025 असं या स्पर्धेचं नाव असणार आहे. ही टूर्नामेंट 13 जुलैपासून सुरू होणार आहे. या टुर्नामेंटची शेवटची तारीख 28 सप्टेंबर असणार आहे. या टुर्नामेंटमध्ये सुमारे 1 करोड रुपयांचे बक्षिस जिंकण्याची संधी आहे. फ्री फायर भारतात बॅन करण्यात आल्यानंतर ही पहिली अधिकृत टूर्नामेंट असणार आहे. विशेष म्हणजेच फ्री फायर मॅक्सवर गेल्या काही वर्षांपासून सक्रिय असलेले खेळाडू आता या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांचा गेम दाखवू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतात फ्री फायर टॉप मोबाइल बॅटल रॉयल गेम्सपैकी एक होता. या गेमच्या टूर्नामेंटद्वारे खेळाडूंना लाखो रुपये जिंकायची संधी देखील उपलब्ध होती. या गेममध्ये लाखो खेळाडू ऍक्टिव्ह असायचे. मात्र गेम अचानक बॅन झाल्याने युजर्स नाराज झाले होते. यामुळे आता या गेमचे पुनरागमन पुन्हा एकदा गेमर्समध्ये एक नवीन उत्साह घेऊन येणार आहे. या गेमचे पुनरागमन कंटेंट क्रिएटर्स, स्ट्रीमर आणि प्रोफेशनल गेमर्ससाठी एक नवीन संधी घेऊन येत आहे.
Flipkart GOAT सेलपूर्वीच पडली Samsung Galaxy S24 Ultra ची किंमत! असा घ्या डिस्काऊंट आणि ऑफरचा फायदा
Sensor Tower नुसार, 2024 -25 या आर्थिक वर्षात, भारताने 8.45 अब्ज मोबाईल गेम डाउनलोडसह जगात पहिले स्थान पटकावले आहे. यावरून, भारतातील मोबाईल गेमिंगची क्षमता किती आहे याचा अंदाज येऊ शकतो. Free Fire Max India Cup 2025 केवळ एक टूर्नामेंट नाही, तर भारतात गेमिंच्या दुनियेत एक नवीन सुरुवात आहे. 1 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसह, या Free Fire Max India Cup 2025 मध्ये केवळ रोमांचक सामनेच पाहायला मिळणार नाहीत तर भारतीय ई-स्पोर्ट्समध्ये नवीन स्टार्स उदयास येण्यास देखील मदत होऊ शकते.