Xiaomi युजर्ससाठी आनंदाची बातमी! फोनची बॅटरी खराब झाली आहे का? मग कंपनीच्या या ऑफरमध्ये बदलून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)
टेक कंपनी Xiaomi नेहमीच त्यांच्या युजर्सच्या फायद्याचा विचार करत असते. कंपनी कधी नवीन फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करते तर कधी ग्राहकांना बजेटमध्ये फोन खरेदी करता यावा यासाठी डिस्काऊंट आणि आकर्षक ऑफर देते. आता पुन्हा एकदा कंपनीने युजर्सच्या फायद्यासाठी एक ऑफर सुरु केली आहे. Xiaomi आपल्या ग्राहकांना स्मार्टफोनची बॅटरी बदलण्यावर सूट देत आहे. स्मार्टफोनला दीर्घकाळ चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी फोनची बॅटरी विशेष भूमिका बजावते. फोनची बॅटरी खराब झाली तर स्मार्टफोन वापरताना मोठ्या समस्या निर्माण होतात.
हेदेखील वाचा- महिला सुरक्षेसाठी सरकारने लाँच केलं SHe-Box Portal; आता ऑनलाईन तक्रार करू शकणार
जर तुम्ही Xiaomi फोन वापरकर्ते असाल आणि तुमचा फोन जुना असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही Xiaomi च्या खास ऑफर्सबद्दल जाणून घेऊ शकता. Xiaomi आपल्या ग्राहकांना बॅटरी बदलण्यावर सूट देत आहे. कंपनी आपल्या ग्राहकांची विशेष काळजी घेत प्रत्येक विभागात फोन ऑफर करते. एवढेच नाही तर ग्राहकांसाठी डिस्काउंट डीलही ठेवल्या जातात. या मालिकेत कंपनीने Xiaomi ग्राहकांसाठी मर्यादित कालावधीसाठी डील जाहीर केली आहे. कंपनी Xiaomi युजर्सना फोनच्या बॅटरी बदलण्यावर सूट देत आहे. कंपनीने या ऑफरसाठी 32 स्मार्टफोन मॉडेल्सची यादी तयार केली आहे. तुम्ही देखील Xiaomi चे ग्राहक असाल आणि तुमच्या स्मार्टफोनचं नाव या यादित असेल तर तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी कमी खर्चात बदलू शकता.
हेदेखील वाचा- ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याची प्रक्रिया धिम्या गतीने! 28 टक्के गावांमध्ये एफटीटीएच कनेक्शन
Xiaomi कंपनी 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत फोन बॅटरी बदलण्यावर सूट देत आहे. ग्राहकांना बॅटरी बदलण्यावर 20 टक्के सूट दिली जात आहे. या डीलचा फायदा Xiaomi च्या वेगवेगळ्या फोन मॉडेल्सवर मिळू शकतो. कंपनीने बॅटरी रिप्लेसमेंटबाबत ऑफर केलेली ही डील Xiaomi फोनच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी खास आहे. Xiaomi फोन खरेदी केल्यानंतर, फोनची बॅटरी दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहावी यासाठी कंपनीने ही ऑफर सुरु केली आहे. कारण फोनचा परफॉर्मन्स चांगला ठेवण्यासाठी बॅटरी महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांनी खरेदी केलेल्या Xiaomi फोन्सना त्यांच्या बॅटरीबाबत कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये, अशी कंपनीची इच्छा आहे. यासाठी कपनीने ही ऑफर सुरु केली आहे.
कंपनीने जाहीर केलेली यादी-