गुगलच्या जाहिरात पॉलिसीमध्ये बदल, छोट्या व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता
गुगलने आपल्या जाहिरात पॉलिसीमध्ये काही बदल केले आहेत. गुगलच्या या निर्णयामुळे छोट्या व्यवसायांवर परीणाम होण्याची शक्यता आहे. या नवीन निर्णयाबाबत गुगलने प्रकाशन जारी केलं आहे. यामध्ये म्हटल आहे की, कंपनी आपल्या Google Local Services जाहिरात धोरणात बदल करत आहे. ज्यामुळे लाखो लहान व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो. 21 नोव्हेंबरपासून, केवळ वेरिफायड गुगल व्यवसाय प्रोफाइल असलेले व्यवसाय जाहिराती चालवण्यास सक्षम असतील.
हेदेखील वाचा- AirPods ला मिळालं हियरिंग एड फीचर, Apple ने तयार केलं जगातील पहिलं एंड-टू-एंड हियरिंग हेल्थ एक्सपीरियंस
तसेच गुगल कंपनी वेळोवेळी आपल्या पॉलिसीमध्ये बदल करत असते. यावेळी गुगलने आपल्या जाहिरात पॉलिसीमध्ये काही बदल केले आहेत, ज्याचा परिणाम छोट्या व्यवसायांवर होणार असल्याचे मानले जात आहे. गुगलच्या माध्यमातून लहान व्यवसाय मोठ्या ऑडियंसपर्यंत झटपट पोहोचू शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगलने आपल्या प्रकाशनात म्हटले आहे की कंपनी आपल्या Google Local Services जाहिरात धोरणात बदल करत आहे, ज्यामुळे लाखो लहान व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो. गुगलने म्हटले आहे की 21 नोव्हेंबरपासून, केवळ व्हेरिफाईड गुगल व्यवसाय प्रोफाइल असलेले व्यवसाय जाहिराती चालवण्यास सक्षम असतील.
या निर्णयामुळे युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील व्यवसायांवर परिणाम होऊ शकतात. गुगलने एका ऑनलाइन पोस्टमध्ये म्हटले आहे की या बदलामुळे युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील व्यवसाय आणि अमेरिका आणि कॅनडामधील निवडक व्यवसायांवर परिणाम होईल. मात्र, कंपनीने यावर एपीच्या मेलला लगेच प्रतिसाद दिला नाही. गुगलचे म्हणणे आहे की हा बदल फसवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे जे छोटे व्यवसाय कायदेशीर आहेत आणि गुगलच्या धोरणातील बदलाची माहिती नाही त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या छोट्या व्यवसायाच्या गुगल बिझनेस प्रोफाइलचे नाव आणि पत्ता जाहिरातीच्या माहितीशी जुळत नसेल, तर जाहिरात बंद केली जाईल.
हेदेखील वाचा- Nokia ने लाँच केला नवीन 4G फीचर फोन! 1000 mAh बॅटरी आणि 2 इंच डिस्प्लेने सुसज्ज
गुगलवर व्यवसायाची पडताळणी करणे अवघड नसले तरी काही वेळ लागतो. व्यवसाय मालकांनी त्यांचा व्यवसाय पत्ता गुगलवर योग्यरित्या टाइप केला पाहिजे आणि तो बरोबर असल्याचा दावा केला पाहिजे आणि नंतर मालकांनी फोन, मजकूर, ईमेल किंवा व्हिडिओद्वारे पत्ता व्हेरिफाईड करणे आवश्यक आहे.
व्हेरिफिकेशन प्रोसेस व्यवसाय श्रेणी आणि स्थानानुसार बदलते. पार्श्वभूमी, व्यवसाय नोंदणी, विमा आणि परवाना तपासणी याविषयी माहिती प्रदान करणे या प्रोसेसमध्ये समाविष्ट असू शकते. गुगलच्या व्हेरिफिकेशनला सात दिवस लागू शकतात. व्यवसायाची पडताळणी झाल्यानंतर, त्याच्या मालकाला सूचित केले जाते.