Google Chrome युजर्ससाठी सरकारची नवीन वाॅर्निंग! ताबडतोब हे काम करा नाहीतर चोरी होतील बँक डिटेल्स
जगभरात वापरला जाणारा गुगल क्रोम हा सर्वाधिक लोकप्रिय वेब ब्राउझर आहे. कोणतीही गोष्ट सर्च करायची असली की लोक या गुगल क्रोमचा वापर करतात. त्यातच आता गुगल क्रोमबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गुगल क्रोम (Google Chrome) युजर्ससाठी आता सरकारने एक नवीन वाॅर्निंग जारी केली आहे. सरकारी एजन्सी CERT-In (Computer Emergency Response Team) ने गुगल क्रोम युजर्ससाठी ही नवीन चेतावणी हाय सिवियरिटी कॅटेगरीमध्ये ठेवली आहे, म्हणजेच ती अत्यंत संवेदनशील आहे. सिक्योरिटी एजन्सीनेला गुगलच्या वेब ब्राउझरच्या आर्बिटरी कोडमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा हॅकर्स घेतात आणि युजर्सची पर्सनल माहिती चोरू शकतात.
सरकारने जारी केलेल्या इशाऱ्यात गुगल क्रोम ब्राउझरमध्ये ही समस्या क्रोम एक्स्टेंशनमध्ये चुकीच्या अंमलबजावणीमुळे आली असल्याचे म्हटले आहे. ही समस्या हॅकर्सना युजर्सच्या सिस्टममध्ये रिमोट ॲक्सेस देऊ शकते. गुगल क्रोमच्या सुरक्षा संरक्षणाला बायपास करण्यासाठी हॅकर्स याचा फायदा घेऊ शकतात. स्कॅमर गुगल क्रोम युजरचे पर्सनल आणि बँकिंग तपशील, पासवर्ड इत्यादी चोरू शकतात. आर्थिक आणि पर्सनल डेटाची चोरी म्हणजे हॅकर्स मोठे सायबर हल्ले करू शकतात, जे खूप हानिकारक ठरू शकतात.
हेदेखील वाचा – Vodafone-Airtel आमने-सामने, सरकारच्या निर्णयावर नाराज, युजर्सवर काय होणार परिणाम?
CERT-In ने 4 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या चेतावणीमध्ये म्हटले आहे की, युजर्सने त्यांच्या PC मधील गुगल क्रोम ब्राउझरचे नवीनतम व्हर्जन 130.0.6723.69 सह अपडेट करावे. यापूर्वीच्या व्हर्जन्सच्या आर्बिटरी कोडमध्ये समस्या आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल तर ते लगेच अपडेट करा. सरकारने जारी केलेला हा इशारा तुम्हाला मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकतो.
हेदेखील वाचा – BSNL युजर्ससाठी आनंदाची बातमी! 5G सर्व्हिस या दिवशी होणार लाँच, तारीख आली समोर
अशाप्रकारे अपडेट करा Google Chrome