मागील काही काळापासून BSNL फार चर्चेत आहे. प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर अनेक युजर्स BSNL कडे वळले. याच गोष्टीचा फायदा घेत BSNL आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट्स घेऊन येत आहे. BSNL लवकरच आपली 4G आणि 5G सर्विस लाँच करणार आहे, जेणेकरून युजर्सना फास्टेस्ट इंटरनेट स्पीड मिळू शकेल. तुम्हीही BSNL युजर असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कंपनीने आपल्या 4G आणि 5G सर्विसची लाँच डेट आता जाहीर केली आहे.
Jio, Airtel आणि Vodafone-Idea नंतर भारत संचार निगम लिमिटेडची (BSNL) 4G आणि 5G सर्विसची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. BSNL ने अधिकृतपणे त्यांच्या 5G सर्विसच्या रोलआउटची पुष्टी केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मते, BSNL चे 5G रोलआउट 2025 मध्ये सुरू होईल. ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, BSNL ने 3.6 GHz आणि 700 MHz फ्रिक्वेन्सी बँडवर 5G रेडिओ ऍक्सेस नेटवर्क (RAN) आणि कोर नेटवर्कची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यांनतर आता भारतात लवकरच 5G सर्व्हिस सुरू होणार आहे.
हेदेखील वाचा – UPI च्या नियमात झाला बदल, 2 हजाराहून जास्तीचे पेमेंट करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी
कधी सुरु होणार BSNL 5G सर्व्हिस
द हिंदूमधील वृत्तानुसार, बीएसएनएलचे आंध्र प्रदेशचे प्रिंसिपल जनरल मॅनेजर,एल.श्रीनु यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली की बीएसएनएल संक्रांती 2025 पर्यंत त्यांची 5G सर्व्हिस सुरू करण्याच्या तयारीत आहेत. सध्या कंपनी काही मूलभूत गोष्टींवर काम करत आहे. जसे की टॉवर्स आणि इतर आवश्यक उपकरणे अपग्रेड करणे, जेणेकरून 5G चा रोल आउट लवकरात लवकर करता येईल.
BSNL’चा मिशन
सध्या, BSNL देशभरात 4G साइट्स इंस्टॉल करत आहे, ज्या 2025 पर्यंत 5G वर अपग्रेड केल्या जातील. BSNL चे 2025 च्या मध्यापर्यंत 100,000 साइट्स इंस्टॉल करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये आतापर्यंत 39,000 साइट्स इंस्टॉल करण्यात आल्या आहेत. स्वदेशी 4G आणि 5G दोन्ही लागू करणारी BSNL देशातील पहिली ऑपरेटर असेल. बीएसएनएलची ही सेवा सध्या टेस्टिंग कालावधीतून जात आहे.
हेदेखील वाचा – कोणी तुमचे प्रायव्हेट कॉल रेकॉर्ड तर करत नाही? चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर महागात पडेल
700 MHz प्रीमियम बँडचे महत्त्व
Reliance Jio सोबत, BSNL ही एकमेव टेलिकॉम कंपनी आहे जिला 700 MHz प्रीमियम बँडमध्ये प्रवेश आहे. हा बँड अधिक चांगले कव्हरेज प्रदान करतो, तर एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन (Vodafone-Idea) आयडियाने जास्त किमतीमुळे त्याचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला नाही.