सावधान! गुगल तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, ताबडतोब फोनमध्ये ही सेटिंग करा, पर्सनल माहिती राहील सेफ
गुगल हे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेलच. आपल्या रोजच्या जीवनात आपण गुगलचा फार वापर करत असतो. कोणत्याही गोष्टीच उत्तर आपल्याला गुगलवर सहज उपलब्ध होत. अशात जगभरातील लाखो युजर्स आज गुगलशी जोडलेला आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? गुगल तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हीटीजवर लक्ष ठेवते. कदाचित खूप कमी लोकांना माहित असेल की तुम्ही तुमच्या फोनवर जे काही करत आहात, त्याची माहिती गुगलपर्यंत पोहोचते. विशेषत: अँड्रॉइड युजर्सची महत्त्वाची माहिती गुगलपर्यंत पोहोचते.
तथापि, आपण इच्छित असल्यास, आपण गुगलच्या नजरेपासून स्वतःचे संरक्षण करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग करावे लागतील. यानंतर तुमची माहिती गुगलपर्यंत पोहोचणार नाही. गुगलचे वेब ब्राउझर Google Chrome Android आणि iOS दोन्ही युजर्स वापरतात. गुगलचा हा ब्राउझर तुमचा इंटरनेट हिस्ट्री आणि वेब ॲक्टिव्हिटी ट्रॅक करत राहतो. तुमची कोणतीही ॲक्टिव्हिटी गुगलद्वारे कॅप्चर करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
हेदेखील वाचा – Jio-Airtel’ची चिंता वाढवण्यासाठी VI घेऊन येत आहे 5G नेटवर्क! या महिन्यात या 17 ठिकाणी मिळेल जबरदस्त स्पीड
फोनमध्ये ताबडतोब करा ही सेटिंग
हेदेखील वाचा – घरबसल्या काही मिनिटांतच अशाप्रकारे डाउनलोड करा पॅन कार्ड! खूप कामाची आहे ही सोपी ट्रिक
Google Chrome युजर्ससाठी वार्निंग
अलीकडेच, गुगल क्रोम युजर्ससाठी सरकारने पुन्हा एकदा एक नवीन वार्निंग जारी केली आहे. केंद्र सरकारच्या आपत्कालीन सुरक्षा शाखा इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने गुगलच्या वेब ब्राउझरबाबत हा हाय सेक्युरिटी वार्निंग जारी केली आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्ये वापरल्या जाणाऱ्या या वेब ब्राउझरमधील त्रुटीमुळे युजर्सचा पर्सनल डेटा हॅकर्सच्या हाती लागू शकतो आणि मोठी फसवणूक होऊ शकते.