Vodafone Idea (Vi) ही भारतातील तिसरा सर्वात मोठा प्रायव्हेट टेलिकॉम ऑपरेटर आहे. माहितीनुसार आता कंपनी मार्च 2025 पर्यंत आपले नेटवर्क सुरू करणार आहे. प्रथम दिल्ली आणि मुंबई आणि नंतर आणखी 17 शहरांमध्ये याची सुरुवात होईल. जून 2025 पर्यंत भारतातील 90% लोकसंख्येला 4G नेटवर्क पुरवण्याचे Vi चे उद्दिष्ट आहे. कंपनीचे मुख्य टेक्नोलॉजी ऑफिसर (CTO) यांनी इकॉनॉमिक टाइम्सला ही माहिती दिली आहे. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घ्या.
कंपनीने उभे केले अवघे 24,000 कोटी
रिव्हाईस प्लानचा भाग म्हणून, Vi ने अवघे 24,000 कोटी रुपयांचा इक्विटी फंडिंग गोळा केला आहे, ज्यात फॉलो-ऑन पब्लिक ऑफरमधून 18,000 कोटी रुपयांचा समावेश आहे, असा टेलिकॉमने अहवाल दिला. हे पैसे 4G नेटवर्क सुधारण्यासाठी आणि 5G नेटवर्क सुरू करण्यासाठी वापरले जातील, असे Vi ने यापूर्वी सांगितले होते.
हेदेखील वाचा – घरबसल्या काही मिनिटांतच अशाप्रकारे डाउनलोड करा पॅन कार्ड! खूप कामाची आहे ही सोपी ट्रिक
Vi चे CTO जगबीर सिंग म्हणाले की, आम्ही 5G नेटवर्क थोडे हळू सुरू करत आहोत. आम्ही प्रथम दिल्ली आणि मुंबई आणि नंतर 17 राज्यांतील सर्व मोठ्या शहरांमध्ये 5G लाँच करू. आज सुमारे 103 कोटी लोकांकडे 4G नेटवर्क आहे जे 77% आहे. Vi ला ते 90% पर्यंत वाढवायचे आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत हे पूर्ण होईल, अशी कंपनीला आशा आहे. ब्रिटनची व्होडाफोन कंपनी आणि भारताच्या आदित्य बिर्ला ग्रुपद्वारे संयुक्तपणे चालवलेली कंपनी 17राज्यांमध्ये 4G आणि 5G नेटवर्कमध्ये आणखीन सुधारणा करेल, असेही त्यांनी सांगितले. यामध्ये अशा लोकांचाही समावेश असेल जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात.
हेदेखील वाचा – आता घरबसल्या काही मिनिटांतच करा आधार-पॅन लिंक! या सोप्या स्टेप्स फॉलो करा
नवीन टॉवर्स लावले जात आहेत
Vi ने 900 MHz बँडमध्ये अनेक नवीन टॉवर लावण्याचे काम सुरु केले आहे. पूर्वी त्यांच्याकडे 55,000 टॉवर होते आणि आता त्यांच्याकडे 100,000 टॉवर्स आहेत. पुढील 9 महिन्यांत ते आणखी 50,000 टॉवर्स बसवण्यात येतील. 900 MHz बँड खूप चांगला आहे कारण तो शहरांमध्येही चांगले नेटवर्क प्रदान करतो. टॉवर उभारण्यात कोणतीही अडचण नसून सर्व टॉवर कंपन्या Vi ‘चे काम मार्चपर्यंत पूर्ण करतील असे कंपनीने म्हटले आहे.