Google for India 2024 Event: गुगलने करोडो भारतीयांना दिलं मोठं गिफ्ट, ईव्हेंटमध्ये केल्या या घोषणा
Google ने आज भारतात आपला वार्षिक कार्यक्रम Google for India 2024 चे आयोजन केले होते. गुगलचा हा ईव्हेंट गेल्या 10 वर्षांपासून भारतात आयोजित केला जात आहे. प्रत्येक ईव्हेंटमध्ये कंपनी आपल्या युजर्ससाठी काही नवीन घोषणा करते किंवा नवीन प्रोडक्ट्स लाँच करते. या ईव्हेंटमध्ये देखील कंपनीने आपल्या भारतातील करोडो युजर्ससाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कंपनी 2015 पासून Google for India ईव्हेंट आयोजित करत आहे. Google for India 2024 इव्हेंट आज सकाळी 11.30 वाजता सुरू झाला. Google च्या अधिकृत YouTube चॅनेलवर या ईव्हेंटचे लाईव्ह प्रेक्षपण सुरु होते.
हेदेखील वाचा- Google Chrome: गूगल क्रोमच्या या ट्रीक्स तुम्हाला बनवतील स्मार्ट, आत्ताच फॉलो करा
Google for India 2024 मध्ये अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये गुगल इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक रोमा दत्ता, गुगल प्रॉडक्ट मॅनेजमेंटच्या वरिष्ठ संचालक हेमा बुडाराजू यांचा देखील समावेश आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनीने Gemini Live, Google Search AI Overviews, Google Lens with Video, AI-summarised reviews, Google Pay UPI Circle, Gold Loan, Apollo Hospital, अशा काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. (फोटो सौजन्य -X)
Google for India 2024 इव्हेंटचे उद्घाटन करताना, Google India चे MD, रोमा दत्ता चौबे म्हणाले की, भारताची AI शक्ती 2030 पर्यंत 33 लाख कोटी रुपयांचे आर्थिक मूल्य निर्माण करू शकते. भारतीय AI चे हे आर्थिक मूल्य संपूर्ण इकोनोमिकल मूल्य तयार करेल. यामध्ये एका पिढीला गती देण्याची ताकद आहे. गुगलची भारतातील भविष्यासाठी 3 मोठी उद्दिष्टे आहेत. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रगती, भारतीय AI परिसंस्थेचा विकास आणि भविष्यासाठी तयारी करणे यांचा समावेश आहे.
Gemini AI
जेमिनी, Google चे सर्वात शक्तिशाली AI मॉडेल, आता हिंदीसह 8 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. भारतातील भाषिक वैविध्य लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गुगल मॅप्स
भारतात, Google ने Google Maps वर 2 नवीन रिअल-टाइम हवामान अपडेट वैशिष्ट्ये जोडली आहेत, जी वापरकर्त्यांना रस्त्यावरील धुके आणि पुराबद्दल सूचना पाठवतील.
आरोग्य क्षेत्रात Google AI
Google AI आता भारतात कर्करोग आणि क्षयरोग तपासणीसाठी वापरला जात आहे. पुढील 10 वर्षांमध्ये हे AI स्क्रीनिंग मोफत देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
Google Pay
Google Pay मध्ये UPI Circle सारखी नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत ज्याद्वारे वापरकर्ते आता इतरांच्या वतीने पेमेंट करू शकतात. तसेच, कर्जाची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली असून, सुवर्ण कर्जाची सुविधाही जोडण्यात आली आहे. जिथून तुम्ही 50 लाख रुपयांपर्यंतचे सोने कर्ज घेऊ शकता.
हेदेखील वाचा- Happy Birthday Google! एक चूक आणि मिळालं नाव, जाणून घ्या Google चा 26 वर्षांचा प्रवास
शिक्षणात AI
Google ने AI Skills House लाँच केले आहे, जे विद्यार्थ्यांना AI शिकण्यासाठी एक व्यासपीठ देते.
व्यावसायिकांसाठी खास AI वैशिष्ट्ये
Google ने व्यापाऱ्यांसाठी अनेक नवीन AI अपडेट लाँच केले आहेत. ज्यामध्ये प्रोडक्ट स्टूडियो, AI-जनरेटेड बिजनेस डिस्क्रिप्शन, व्हाट्सएप इंटीग्रेशन यांचा समावेश आहे. हेमा बुद्राजू म्हणाल्या, “भारत ही जगातील पहिली बाजारपेठ आहे जिथे Google या सुविधा सुरू करत आहे.”
Apollo Hospital सोबत भागिदारी
Google ने हिंदी आणि इंग्रजीमध्ये 800 हून अधिक “आरोग्य ज्ञान पॅनेल” तयार करण्यासाठी Apollo Hospitals सोबत भागीदारीची घोषणा केली आहे.
ABHA ओळखपत्रे Google Wallet वर उपलब्ध असणार
Google वॉलेट ॲपवर 60 लाख लोकांना ABHA आयडी कार्ड देण्यासाठी Google Eka Care सोबत भागीदारी करेल. ABHA आयडी धारकांना त्यांचा हेल्थ आयडी गुगल वॉलेटमध्ये जोडण्यासाठी किंवा ऍक्सेस करण्यासाठी फक्त त्यांच्या फिंगरप्रिंट किंवा पासवर्डची आवश्यकता आहे.
Google Play Protect
Google Play Protect आता आपली सुरक्षा वैशिष्ट्ये मजबूत करत आहे, जेणेकरून वापरकर्त्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण मिळू शकेल. Google Play Protect आता आपोआप स्कॅन करेल आणि धोके ओळखेल आणि वापरकर्त्यांना त्याबद्दल सूचित करेल.
गुगल लेन्स विथ व्हिडिओ फीचर
आत्तापर्यंत तुम्ही चित्राचा फोटो घेण्यासाठी आणि त्याबद्दल शोधण्यासाठी Google Lens चा वापर केला असेल, परंतु आता फोटोसोबत तुम्ही Google Lens मध्ये कोणताही व्हिडिओ कॅप्चर करू शकता आणि त्याबद्दलची माहिती शोधू शकता.