Happy Birthday Google! एक चूक आणि मिळालं नाव, जाणून घ्या Google चा 26 वर्षांचा प्रवास
तुम्हाला जर विचारलं की इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठं नाव कोणतं? तर तुमच्या समोर एकचं चित्र उभं राहिल ते म्हणजे Google. Google आपल्या रोजच्या जगण्याचा एक भाग आहे. Google च्या वापराशिवाय आपला एकही दिवस जाणं कठीण आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या कामांसाठी Google चा वापर करतो. दिवसातून कितीवेळा तुम्ही Google चा वापर करता, याचे उत्तर तुमच्याकडे आहे का? निश्चितच याचं उत्तर मिळणं कठीण आहे. कारण आपण आपल्या प्रत्येक कामासाठी Google चा वापर करत आहोत.
हेदेखील वाचा- 90 टक्के लोकांना माहित नाही Google आणि Chrome मधील फरक! दोन्ही समान की वेगळे, जाणून घ्या उत्तर
आपल्याला रोज मदत करणारा Google आज 27 सप्टेंबर रोजी 26 वर्षांचा झाला आहे. Google आज आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. यासाठी एक खास डूडल देखील तयार करण्यात आलं आहे. खरं तर 4 सप्टेंबर 1998 रोजी एका कार्यक्रमात अधिकृतपणे सर्च इंजिन म्हणून Google लाँच करण्यात आले होते. मात्र 27 सप्टेंबर रोजी गूगल सर्च इंजिनवर रेकॉर्ड नंबर्स पेज सर्च करण्यात आले होते, त्यामुळे 27 सप्टेंबरला Google आपला वाढदिवस साजरा करतो. आज जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून Google ची ओळख आहे. Google 100 हून अधिक भाषांमध्ये वापरलं जात. (फोटो सौजन्य – pinterest)
1990 च्या दशकात स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी Google नावाचा शोध लावला आणि इंटरनेट सर्फिंगचे जग पूर्णपणे बदलून टाकले. लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन यांनी Google लाँच करून एक मोठी क्रांती केली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात, सर्वकाही Google वर आसपास आहे. म्हणजेच, सामान्य माणसाच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कदाचित गुगलकडे आहे. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की ज्या लोकांनी Google ला जन्म दिला त्यांना Google नाही तर दुसरे काहीतरी नाव ठेवायचे होते. त्याच्या छोट्याशा चुकीने टायपिंग मिस्टेक झाली आणि आपल्या लाडक्या सर्च इंजिनला Google हे नाव मिळालं.
हेदेखील वाचा- 1 सप्टेंबरपासून बंद होणार ‘हे’ ॲप्स; Google ने उचललं मोठं पाऊल, स्पॅमची समस्या होणार कमी
जेव्हा लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन शोध इंजिन विकसित करत होते, तेव्हा त्यांच्या मनात होते की ते त्याला एक नाव देतील जे वेब जगतातील मोठ्या डेटाचे प्रतिनिधित्व करेल. बराच विचार केल्यानंतर दोघांनी एकमताने Googol हे नाव ठरवलं. Googol म्हणजे ‘1’ त्यानंतर 100 शून्य. वैज्ञानिक भाषेत याला ‘टेन टू द पॉवर हंड्रेड’ असेही म्हणता येईल. Googol हे नाव देण्यामागे पेज आणि ब्रिन यांचा एकच हेतू होता की हा शब्द त्यांच्या कल्पनेला बळ देत होता ज्यात त्यांनी वेब जगात उपलब्ध असलेली सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचे स्वप्न पाहिले होते.
वेब जगतातील कोणत्याही वेबसाइटची नोंदणी करण्यासाठी, एक नाव द्यावे लागते, ज्याला डोमेन म्हणतात. जेव्हा लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन त्यांच्या शोध इंजिनचे डोमेन नोंदणी करत होते, तेव्हा त्यांनी ‘googol.com’ च्या ऐवजी ‘google.com’ अशी नोंदणी केली. यानंतर दोघांनी google नावासोबतच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही छोटीशी चूक भविष्यात बहुराष्ट्रीय टेक जायंट कंपनी म्हणून ओळखली जाईल आणि जगातील सर्वात मान्यताप्राप्त ब्रँड बनेल याची त्यांना त्यावेळी फारशी कल्पना नव्हती.
सुंदर पिचाई सध्या गुगलचे सीईओ आहेत. सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे नागरिक आहेत ते 2004 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले होते. 2014 मध्ये त्यांना Google चे CEO म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. जर आपण सुंदर पिचाई यांच्या पगाराबद्दल बोललो तर त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 1720 कोटी रुपये आहे.