Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google ने लाँच केलं नवीन टूल, आता AI जनरेट इमेज आणि डीपफेक ओळखणं होईल अधिक सोपं

एलन मस्क, रश्मिका मंदना, आलिया भट्ट, रणवीर सिंह, कॅटरिना, काजोल यांचा डिपफेक काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. खरे फोटो आणि AI च्या मदतीने तयार करण्यात आलेल्या फोटोंमधील फरक ओळखणं कठीण होतं. डीपफेकच्या बाबतीत सुध्दा असंच आहे. हाच फरक ओळण्यासाठी आता गुगलने एक नवीन टूल लाँच केलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 13, 2024 | 08:55 AM
Google ने लाँच केलं नवीन टूल, आता AI जनरेट इमेज आणि डीपफेक ओळखणं होईल अधिक सोपं

Google ने लाँच केलं नवीन टूल, आता AI जनरेट इमेज आणि डीपफेक ओळखणं होईल अधिक सोपं

Follow Us
Close
Follow Us:

सध्या AI जनरेट इमेज आणि डीपफेकचे जग आहे. तुम्हाला सोशल मिडीया आणि इंटरनेटवर अनेक असे व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतील जे AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. काहीवेळा AI च्या मदतीने तयार करण्यात आलेले हे फोटो अगदी खऱ्या फोटोंसारखे दिसतात, त्यामुळे खरे फोटो आणि AI च्या मदतीने तयार करण्यात आलेल्या फोटोंमधील फरक ओळखणं कठीण होतं. डीपफेकच्या बाबतीत सुध्दा असंच आहे. या बनावट व्हिडीओ आणि फोटोंमुळे अनेकदा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.

हेदेखील वाचा- आधार कार्डमध्ये कोणती माहिती किती वेळा अपडेट केली जाऊ शकते, काय सांगतात नियम? जाणून घ्या

आता तुमचा हाच संभ्रम दूर होणार आहे. कारण गुगलने एक नवीन टूल लाँच केलं आहे. या नव्या टूलच्या मदतीने AI च्या मदतीने तयार करण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ ओळखण्यासाठी मदत होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे फोटो आणि डीपफेक तयार करून काही गुन्हे देखील घडले आहेत. या सर्वांपासून आता गुगलच्या नवीन टूलमुळे सुटका मिळणार आहे.

Google ने Content Credentials नावाची टेक्नोलॉजी स्टेंडर्डचे अधिक सुरक्षित वर्जन लाँच केलं आहे. नवीन तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित केले गेले आहे आणि कोणत्याही प्रकारच्या टँपरिंगसाठी ते अधिक सुरक्षित आहे. Content Credentials तंत्रज्ञान AI च्या मदतीने तयार करण्यात आलेल्या फोटो आणि व्हिडीओना एक लेबल देईल, ज्यामुळे त्यांची ओळख करणं अधिक सोप होणार आहे.

गुगलच्या म्हणण्यानुसार, युजर्सची सर्व माहिती गुगल इमेजेस, लेन्स आणि सर्कल टू सर्चवर दिसणाऱ्या इमेजमधील कंटेंट क्रेडेंशियलमध्ये आढळेल. याचा अर्थ वापरकर्ते कोणत्याही फोटोच्या अबाउट या इमेज विभागात जाऊन इमेज कोणत्याही प्रकारच्या एआय टूलच्या मदतीने तयार केली गेली आहे की नाही किंवा ती एडीट केली गेली आहे हे पाहू शकतील. यासोबतच Google आपली जाहिरात प्रणाली C2PA मेटाडेटाशी जोडण्याचा विचार करत आहे.

हेदेखील वाचा- मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? एअरटेल आणि VI च्या किंमती वाढण्याची शक्यता

हा डेटा भविष्यात कंपनीच्या धोरणांची माहिती देईल. याशिवाय युजर्सना C2PA माहिती देण्यासाठी गुगल यूट्यूबवर काम करत आहे. त्याच्या मदतीने व्हिडिओ कॅमेराने शूट केला गेला आहे की डिजीटल बनवला गेला आहे याची माहिती युजर्सना मिळेल. या नवीन टूलच्या मदतीने युजर्ससाठी व्हिडीओ बाबतची माहिती मिळवणं अधिक सोपे होणार आहे.

अहवालानुसार, फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग आणि स्टोरेजमध्ये नवीन आयडी टॅग जोडले जात आहेत, जे AI माहिती आणि इमेजच्या डिजिटल स्रोताविषयी माहिती प्रदान करतील. डीपफेक थांबवण्यासाठी गुगल या फीचरवर काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. डीपफेक हे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ फाइल्स किंवा इतर माध्यमे आहेत जी चुकीची माहिती पसरवण्यासाठी किंवा लोकांची दिशाभूल करण्यासाठी AI वापरून डिजिटली तयार किंवा एडीट केली जातात.

एलन मस्क, रश्मिका मंदना, आलिया भट्ट, रणवीर सिंह, कॅटरिना, काजोल यांसारखे अनेकजण आतापर्यंत डिपफेकचे शिकार झाले आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कंपनीच्या मालकाविरुद्ध खटला दाखल केला ज्याच्या डीपफेक व्हिडिओ जाहिरातींनी तो त्या कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात करत होता.

Web Title: Google launch new tool which will help in findout ai generated images and deepfake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 08:55 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.