मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? एअरटेल आणि VI च्या किंमती वाढण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वीच देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्हिआयने त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. यामुळे देशातील सर्वच मोबाईल युजर्सनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. महागड्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीनंतर आता टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा झटका देऊ शकतात. आता पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या जाऊ शकतात.
हेदेखील वाचा- टेलिग्रामने लाँच केलं फोन नंबर व्हेरिफिकेशन फीचर, जाणून घ्या कसे काम करेल
काही दिवसांपूर्वीच सर्व मोठ्या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. आता असे बोलले जात आहे की येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा युजर्सना महागड्या रिचार्जचा फटका सहन करावा लागू शकतो. Vodafone Idea आणि Airtel या दोन्ही टेलिकॉम कंपन्या 2027 मध्ये किंवा त्यापूर्वी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमती 15 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. यामुळे रिचार्ज प्लॅन महाग होण्याची कोंडी अद्याप संपलेली नाही. अनेक मोबाईल युजर्स स्वतःसाठी रिचार्ज प्लॅन शोधत आहेत. पण आता अशातच टेलिकॉम कंपन्या पुन्हा रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवू शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)
देशातील अनेक दूरसंचार कंपन्यांकडे रिचार्ज आशियाई देशांपेक्षा 15 टक्क्यांपर्यंत महाग करण्याची संधी आहे. त्यामुळे आता या संधीचा फायदा घेत कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अनेक आशियाई देशांच्या तुलनेत भारतात दूरसंचार सेवा अजूनही परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत टेलिकॉम कंपन्या आगामी काळात रिचार्ज 15 टक्क्यांनी वाढवण्याच्या दिशेने पावले उचलू शकतात. जर कंपन्यांनी 2027 पर्यंत किंवा त्यापूर्वी रिचार्ज महाग केले तर ती आश्चर्याची गोष्ट ठरणार नाही.
जेपी मॉर्गन तज्ज्ञांच्या मते, एजीआर प्रकरणात गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर व्होडाफोन आयडियासाठी दर वाढवणे गरजेचे बनले आहे. जेणेकरून कंपनी थकबाकी एजीआरसह थकबाकीदार स्पेक्ट्रम भरण्यास सक्षम असेल. परदेशी ब्रोकरेज हाऊसच्या मते, इतर सर्व देशांच्या तुलनेत भारतात डेटा अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा- आता गाणी ऐकण्याचा आनंद होईल दुप्पट! Spotify चे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन केवळ 15 रुपयांमध्ये
भारतीय डेटा उत्पन्न 0.09 डॉलर प्रति GB या प्रदेशात सर्वात कमी आहे. ब्रोकरेजला अपेक्षा आहे की आर्थिक वर्ष 2027 मध्ये, तीन दूरसंचार कंपन्या भारती एअरटेल, भारती हेक्साकॉम आणि व्होडाफोन आयडिया त्यांचे रिचार्ज 15 टक्क्यांनी महाग करू शकतात.
रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्यामागे 5G कनेक्टिव्हिटी हे देखील एक कारण आहे. आगामी काळात रिचार्ज योजना महाग होण्यामागे 5G कनेक्टिव्हिटी हे देखील एक कारण आहे. BSNL आणि Vodafone Idea सारख्या कंपन्या त्यांच्या सेवा सुधारण्यावर आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत, जरी या कंपन्यांनी 5G कव्हरेज देशातील बहुतेक भागात विस्तारित केले तरीही त्यांना रिचार्ज महाग करण्याची संधी असेल.