फोटो सौजन्य - pinterest
आपण आपले सर्व फोटो Google Photos मध्ये सेव करतो. ज्यामुळे आपल्याला कधीही कोणताही फोटो पाहिजे असल्यास तो सहज शोधता येईल. Google Photos मध्ये फोटो सेव करण्याचे अनेक फायदे आहेत. Google Photos मध्ये सेव केलेले फोटो आपण अगदी 4 ते 5 वर्षांनतर देखील सहज शोधू शकतो. Google Photos सर्व युजर्ससाठी अतिशय फायदेशीर आहे. अशातच आता कंपनीने Google Photos मध्ये एक नवं फीचर लाँच केलं आहे. ज्याच्या मदतीने युजर्स Google Photos मध्ये त्यांचे फोटो एडीट करू शकतील.
हेदेखील वाचा- Google ची एक चूक युजर्सना पडली महागात; 1.5 करोड लोकांचे पासवर्ड धोक्यात
सहसा आपल्याला एखादा फोटो एडीट करायचा असेल तर थर्डी पार्टी अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्यानंतर आपण त्या थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने फोटो एडीट करतो. पण आता फोटो एडीट करण्यासाठी आपल्याला कोणत्याही थर्डी पार्टी अॅपची गरज भासणार नाही. Google Photos मधील Advanced AI एडीटींग टूल्सच्या मदतीने आपण अगदी सहज आपले फोटो एडीट करू शकतो. या टूलचा वापर करण्यासाठी आता कोणत्याही सब्सक्रिप्शनची गरज नाही. सर्व Google Photos युजर्स मोफत Advanced AI एडीटींग टूल्सचा वापर करू शकतात. यामध्ये Magic Eraser, Photo Unblur आणि Portrait Light यांसारख्या फीचरचा समावेश आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल त्या पध्दीतीने तुमचा फोटो एडीट करू शकता.
हेदेखील वाचा- वेबसाईटवरील जाहिरातींनी हैराण झालात? Google Chrome वर आत्ताच करा ‘ही’ सेटिंग
Google Photos मधील Advanced AI एडीटींग टूल्सबद्दल Google Photos च्या सीनियर प्रोडक्ट मॅनेजर सेलेना शांग यांनी संगितलं की, सर्व Google Photos युजर्स मोफत Advanced AI एडीटींग टूल्सचा वापर करू शकणार आहेत. या टूलचा वापर करण्यासाठी आता कोणत्याही सब्सक्रिप्शनची गरज नाही. हे टूल सर्व युजर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी आमच्या टीमने प्रचंड मेहनत केली आहे. आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे आज हे टूल सर्वांपर्यंत पोहोचलं आहे. Android आणि iOS दोन्ही डिवाइसेस असलेले युजर्स Advanced AI एडीटींग टूल्सचा वापर करू शकणार आहेत. यामध्ये Magic Eraser, Photo Unblur आणि Portrait Light यांसारख्या फीचरचा समावेश आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज तुमचा फोटो एडीट करू शकता.
तुम्ही तुमच्या फोटोच्या ऑप्टिमल रिजल्टसाठी लेयरिंग एडिटिंग करू शकता. उत्कृष्ट फोटो क्वालिटीसाठी लेयरिंग एडिटिंग अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या फोटोमध्ये लेयर्स एडिट करायचं असल्यास Advanced AI एडीटींग टूल बेस्ट ठरू शकेल. या टूलच्या मदतीने फोटोचा टोन मॅनेज करता येईल व त्यात असलेल्या अनावश्यक वस्तूंना किंवा गोष्टींना हे टूल क्लीन करतं.
Google Photos मधील Advanced AI एडीटींगच्या मदतीने तुम्ही फोटोमधील लहान पार्ट्स क्विक फिक्ससाठी Magic Eraser चा वापर करू शकता. Background मध्ये लोक किंवा वस्तू असलेल्या लँडस्केप शॉट्ससाठी तुम्ही Magic Eraser वापरू शकता.
Magic Editor मध्ये Tap, Brush, आणि Circle असे 3 ऑप्शन आहेत. हे तीनही टूल्स वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट् देतात. Tap हे टूल ठळक बाऊंड्रिज असलेल्या वस्तूंसाठी योग्यप्रकारे काम करते. तसेच, ज्या वस्तूंच्या बाऊंड्रिज स्पष्ट दिसत नाही त्यासाठी ब्रश किंवा सर्कल उत्तम आहे.