वाहतूकीच्या दंडापासून वाचण्यासाठी आता Google Map देणार सूचना (फोटो सौजन्य - pinterest)
आपण कुठेही प्रवासाला जाताना Google Maps चा वापर करतो. कॅब ड्रायव्हर देखील रस्ता शोधण्यासाठी Google Maps चा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कोणत्याही ठिकाणी जाण्याचा रस्ता शोधायचा असेल तर Google Maps शिवाय दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही. तुम्ही देखील प्रवास करताना Google Maps चा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Google Maps आता तुम्हाला केवळ रस्ताच दाखवणार नाही, तर वाहतूकीच्या दंडापासून वाचण्यासाठी देखील मदत करणार आहे. कसं जाणून घ्या.
हेदेखील वाचा- Google Map Vs Ola Map: Google Maps आणि Ola Maps मध्ये काय फरक आहे; जाणून घ्या
रस्त्यावर प्रत्येकाने वाहतूकीच्या नियमांचं पालन केलं पाहिजे यासाठी पोलीस नेहमी सतर्क असतात. ज्या व्यक्ति नियमांचे पालन करणार नाहीत अशा व्यक्तिंकडून दंड देखील आकारला जातो. पण हा दंड टाळण्यासाठी लोकं विविध युक्त्या वापरतात. पण आता तुमचा आवडता Google Maps तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल माहीती देणार आहे. वाहतूकीच्या दंडापासून वाचण्यासाठी Google Maps मदत करणार आहे. Google Maps पोलीस चौकी किंवा पोलिसांच्या सतर्कतेबद्दल चेतावणी देणार आहे. ज्यामुळे तुम्ही हेल्मेट घातलं नसेल तर तुम्ही तात्काळ ते परिधान करू शकता किंवा तुमच्या वाहतुकीचा मार्ग बदलू शकता.
रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस ठिकठिकाणी सतर्क राहतात आणि नियमांचे पालन न केल्यास वाहनचालकांकडून दंड आकरतात. मात्र रस्त्यावर दंड टाळण्यासाठी लोक विविध युक्त्या वापरतात. आता लोक हायटेक युक्त्या देखील वापरत आहेत. आता, लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप Google Maps वाहनचालकांना पोलीस चौकी किंवा पोलिसांच्या सतर्कतेबद्दल चेतावणी देणार आहे, ज्यामुळे दंड टाळण्यासाठी चालक आपला मार्ग बदलू शकतील.
हेदेखील वाचा- Google Map च्या भारतातील नियमात बदल! आता डॉलर नाही तर भारतीय चलनात द्यावे लागणार पैसे
अलीकडेच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Google Maps’ च्या स्क्रीनशॉटने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.Google Maps मध्ये चेन्नईच्या अनेक भागात पोलीस चौक्या दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता युजर्सना पोलिसांच्या उपस्थितीबद्दल चेतावणी दिली जाणार आहे. ज्यामुळे वाहनचालक चलन टाळण्यासाठी मार्ग बदलू शकतील किंवा या ठिकाणाहून जाताना हेल्मेट घालतील. Google Maps चं हे नवीन फीचर लोकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, यात शंकाच नाही. मात्र याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे.
चेन्नईतील फिनिक्स मॉलजवळील एका जागेला ‘पोलिस इरुपंगा हेल्मेट पोधुंगो (इथे पोलीस आहे, हेल्मेट घाला)’ असे नाव देण्यात आले आहे.अलीकडेच संतोष सिवन नावाच्या युजरने चेन्नईतील फिनिक्स मॉलजवळील गुगल मॅपचा स्क्रीनशॉट X वर शेअर केला आहे. याला 3.35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चलन टाळण्यासाठी या हायटेक ट्रिकवर अनेक युजर्सनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या. बेंगळुरूमध्येही अशी प्रकरणे समोर आली आहेत. ट्रॅफिक पोलिसांपासून वाचण्यासाठी कोणीतरी Google Maps वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच, कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील असाच नकाशाचा स्क्रीनशॉटही व्हायरल झाला होता.