Google Map Update: फ्रीमध्ये व्हाईट हाऊसला भेट देण्याची इच्छा आहे? गुगल मॅप करणार तुमची मदत
गुगल मॅप आपल्या प्रत्येक प्रवासाचा साथी आहे, असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर रस्ता चुकलो किंवा हरवलो तर सर्वात आधी आपण गुगल मॅपची मदत घेतो. गुगल मॅपच्या मदतीने आपण अगदी कुठेही सहज प्रवास करू शकता. याचं कारण म्हणजे गुगल मॅपकडे प्रत्येक ठिकाणाची माहिती आहे. भारतासह जगभरात गुगल मॅपचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही भारताबाहेर फिरायला गेल्यानंतर देखील गुगल मॅपची मदत घेऊ शकता.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भारताबाहेर जायचं असेल तर प्रचंड पैसे खर्च करावे लागतील. पण परदेशातील असं एक ठिकाण आहे, जे तुम्ही घरबसल्या पाहू शकता. गुगल मॅप तुम्हाला या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाणार आहे. हे ठिकाण म्हणजे अमेरिकेतील व्हाईट हाऊस. आता घरबसल्या व्हाईट हाऊस कसं फिरणार असा प्रश्न तुमच्या मनात देखील आला असेल. तर यासाठी गुगल मॅप तुमची मदत करणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हाईट हाऊसचा फेरफटका मारण्यासाठी तुम्हाला अमेरिकेला जावे लागेल का? तर नाही. आता गुगल तुम्हाला त्याची फुकट टूर देणार आहे, आता प्रश्न आहे कसा? आम्ही तुम्हाला सांगतो की ही टूर वर्चुअली असेल आणि तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. यासाठी व्हाईट हाऊस आणि गुगलने सहकार्य केले आहे जेणेकरून लोक व्हाईट हाऊसमध्ये न जाता देखील त्या ठिकाणांचा आनंद घेऊ शकतील.
व्हाईट हाऊस ही एक ऐतिहासिक इमारत आहे, ज्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे (अधिकृत) निवासस्थान म्हटले जाते, त्यामुळे प्रत्येकजण या इमारतीला भेट देऊ शकत नाही. याशिवाय, तुम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागेल, जे बजेटच्या बाहेर असू शकते.
अशा परिस्थितीत हा नवीन पर्याय खूप चांगला आहे, ज्यामध्ये तुम्ही घरी बसून व्हाईट हाऊसला भेट देऊ शकता आणि तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. गुगल मॅप्स आणि गुगल आर्ट्स अँड कल्चरने व्हाईट हाऊसच्या सहकार्याने ही व्हर्च्युअल टूर सुरू केली आहे. कारण प्रत्येकजण व्हाईट हाऊसला भेट देण्यासाठी वॉशिंग्टन, डी.सी.ला जाऊ शकत नाही.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुम्हालाही वर्चुअली व्हाईट हाऊसची टूर करायची असल्यास, तुम्ही https://artsandculture.google.com/story/aQVRQ1-zMnlrnQ वर जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला त्या सर्व खोल्यांचा फेरफटका मारू शकता. जे सार्वजनिक सभांदरम्यान विझीटर्सना दाखवले जातात.
हा संपूर्ण टूर व्हर्च्युअल असेल, ज्यामध्ये इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अपंगांसाठी ऑडिओ कॅप्शनसह स्पॅनिशमध्ये भाषांतरित केले आहे. यासाठी गुगलने आपल्या स्ट्रीट व्ह्यू तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्याच्या मदतीने त्याच्या सर्व खोल्यांची प्रतिमा कॅप्चर करण्यात आली आहे.