Google Map Update: अशा पद्धतीने गुगल मॅपवरून डिलीट करा तुमचा पर्सनल डाटा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रॉसेस
आपण सगळे वेगवेगळ्या कामांसाठी गुगल वापरतो. अशा परिस्थितीत, आपण स्वतःच बहुतेक माहिती गुगलला देतो आणि मोठ्या आवडीने हायलाइट करतो. मात्र तुम्ही आतापर्यंत अनेकवेळा ऐकलं किंवा वाचलं असेल की गुगल आपली माहिती सेव्ह करतो. गुगल प्रमाणेच गुगल मॅप देखील आपली माहिती सेव्ह करतो. हीच आपली माहिती कशी डिलीट करायची याची सोपी प्रोसेस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गुगल मॅप संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अनेक वेळा आपण आपली वैयक्तिक माहिती गुगल मॅपवर टाकतो किंवा कोणीतरी ती अपलोड करतो ज्यात घराचा पत्ता, लायसन्स प्लेट आणि सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची असलेली इतर ओळखण्यायोग्य ठिकाणं यांसारखी वैयक्तिक माहिती असते. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल मॅपवर तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती असल्यास, घाबरू नका, गुगलमध्ये असे टूल उपलब्ध आहेत, जे युजर्सना त्यांची
संवेदनशील माहिती अस्पष्ट करू देते. आज आम्ही तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, जसे की तुमचे घर आणि तुमच्या वाहनाची लायसन्स प्लेट, गुगल मॅपवरून कशी डिलीट करायची याची प्रोसेस सांगणार आहोत.
गुगल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा