Instagram Down: इंस्टाग्राम डाऊन, युजर्स वैतागले! पोस्ट शेअर करण्यात येतेय अडचण
लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम भारतसग जगभरात डाऊन झालं आहे. मेटा-मालकीच्या फोटो व्हिडिओ प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामला आउटेजचा सामना करावा लागत आहे. याचा लाखो युजर्सवर परिणाम झाला आहे. युजर्स सतत इंस्टाग्राम डाऊनच्या तक्रारी करत आहेत. तसेच याचे मिम्स देखील सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल होत आहेत.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भारतासह जगभरातील हजारो इंंस्टाग्राम वापरकर्ते प्रभावित होत आहेत. या समस्येच्या तक्रारी वाढल्या आहेत. युजर्सना त्यांच्या अकाऊंटमध्ये प्रवेश करण्यात तसेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात अडचणी येत आहेत. अनेक वापरकर्त्यांना व्हिडिओ पाहण्यात समस्या येत आहेत. DownDetector ने देखील इंस्टाग्राम डाउन झाल्याची पुष्टी केली आहे. लवकरच ही समस्या सोडवली जाईल आणि इंस्टाग्राम सुरु होईल, असं देखील सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
DownDetector च्या मते, इंस्टाग्राम समस्यांबद्दल 1,500 हून अधिक अहवाल आले आहेत. ज्यामध्ये सकाळी 10:37 च्या सुमारास सर्वाधिक तक्रारी आहेत. ही आठवडभरातील दुसरी घटना आहे. म्हणजेच एका आठवड्यातील इंस्टाग्रामचा हा दुसरा मोठा व्यत्यय आहे, याआधी हे इंस्टाग्राम 13 नोव्हेंबरला डाऊन झाले होते. तेव्हा देखील युजर्सना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागला होता. इंस्टाग्रामच्या सततच्या आऊटेजमुळे युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
इंस्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांच्या अकाऊंटमध्ये प्रवेश करण्यात अडचणी येत आहेत. प्रभावित झालेल्यांपैकी, 70 टक्के लोकांनी ॲपसह समस्या नोंदवल्या, तर 16 टक्के सर्व्हर कनेक्शन समस्या नोंदवल्या आणि 14 टक्के लोकं त्यांच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकले नाहीत. त्याच वेळी, वापरकर्त्यांनी सांगितले की ते व्हिडिओ अपलोड करण्यास सक्षम नाहीत.
इंस्टाग्राम आउटेज भारतात आणि देशाबाहेरही दिसून आले आहे. कारण जगभरातील वापरकर्ते X वर तक्रार करत आहेत. असंख्य तक्रारी आणि आउटेजमुळे झालेल्या जागतिक आउटेजबद्दल इंस्टाग्रामने अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
इंस्टाग्रामसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
इंस्टाग्राम डाऊनचे अपडेट युजर्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करत आहेत. एक्सवर मिम्स शेअर करण्यात आले आहेत.
why is instagram always down pic.twitter.com/VtOLSgP2u0
— 𝒦. (@SABSYAIL) November 19, 2024
Instagram stops working 😭 #instagramdown pic.twitter.com/kpRD5rgf2B
— 𝐑𝐢𝐭𝐢𝐤𝐚ᥫ᭡ (@ritz__thoughts) November 19, 2024
INSTAGRAM DOWN I CANT USE THE MUSIC FEATURE pic.twitter.com/alNVfpQoYs
— ROXXY HO. 🍀 (@Roxxyyllc) November 19, 2024
What’s up, do you have the same? #instagramdown #instagram #instagrambug pic.twitter.com/279YhLVlJy
— Kiran Kadam Vlogs (@kirankadamvlogs) November 19, 2024
इंस्टाग्राम भारतासह जगभरातील लोकप्रिय सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासाठी तसेच रिल्स पाहण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर केला जातो. इंस्टाग्रामचे करोडो युजर्स आहेत. इंस्टाग्राम पैसे कमावण्याचे साधन देखील आहे.