Google Pay UPI Circle: आता बँक खात्याशिवाय करू शकता ऑनलाईन पेमेंट! कसे ते जाणून घ्या
युपीआय पेमेंटचा वापर भारतात ऑनलाइन पेमेंटसाठी केला जातो. Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या कंपन्या देशात युपीआय पेमेंट सेवा प्रदान करतात. तुम्ही त्यांच्या ॲपद्वारे सहजपणे ऑनलाइन पेमेंट करू शकता. ते वापरण्यासाठी, तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे, परंतु एका वैशिष्ट्याच्या आधारे, Google Pay तुम्हाला बँक खात्याशिवाय पेमेंट करण्याची परवानगी देते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच UPI सर्कल लाँच केले आहे. आता गुगलने आपल्या पेमेंट सेवेसाठी ते सादर केले आहे.
गुगलने ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF 2024) मध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यांचे अनावरण केले. कंपनीने Google Pay साठी युपीआय सर्कल (UPI Circle) सादर केले आहे, जे तुमचा डिजिटल पेमेंट अनुभव सुधारेल. या अंतर्गत तुमचे कुटुंब आणि मित्रमंडळी तुमच्या जागी पेमेंट करू शकतात. नवीन वैशिष्ट्ये Google Pay ला UPI पेमेंट सेवेमध्ये PhonePe आणि Paytm सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यास मदत करू शकतात.
हेदेखील वाचा – भारतीयांविरुद्ध Racist पोस्ट करणाऱ्या Barry Stanton’चे एक्स अकाउंट सस्पेंड
नुकतेच NPCI ने युपीआयसाठी युपीआय सर्कल फीचर सादर केले आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना तुमच्या वतीने युपीआय पेमेंट करण्याची सुविधा देऊ शकता. यासाठी त्यांना त्यांचे बँक खाते लिंक करण्याची गरज नाही. तुम्ही कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना सेकंडरी पार्टिसिपंट्स बनवू शकता.
तुम्ही दुसेकंडरी पार्टिसिपंट्सची पर्शियल किंवा फुल डेलिगेशन कॅटेगरीमध्ये नोंदणी करू शकता. सेकंडरी पार्टिसिपंट्स जे पेमेंट करतील त्यांच्यासाठी दरमहा 15,000 रुपयांची लिमिट निश्चित करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा – एलॉन मस्कला मोठा झटका! ब्राझीलमध्ये X बॅन, वापर केल्यास भरावा लागेल 7 लाखांचा दंड
eRupi Voucher: हे व्हाउचर आधारित पेमेंट फिचर आहे. सरकारी विभागांसह विद्यमान UPI संस्था या वैशिष्ट्याखाली UPI व्हाउचर जारी करू शकतात. हे व्हाउचर वेगवेगळ्या सेवा आणि व्यवहारांमध्ये रिडीम केले जाऊ शकतात.
Tap & Pay Payments: या फिचरमुळे मोबाइलद्वारे रुपे कार्डद्वारे पेमेंट करणे खूप सोपे होईल. तुम्हाला Google Pay मध्ये RuPay कार्ड तपशील जोडावे लागतील. यानंतर कार्ड स्कॅनिंग मशीनवर मोबाईल टॅप करून पेमेंट केले जाईल.
UPI Lite Autopay: हे फिचर UPI Lite युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. जर UPI Lite मध्ये तुमचा बॅलेंस लिमिट कमी होऊन जात असेल तर या ऑप्शनमुळे बॅलेंस आपोआप क्रेडिट होऊन जातो.
ClickPay QR: पेमेंटच्या रकमेनुसार QR कोड तयार करण्याची सुविधा मिळेल. हा कोड स्कॅन करून थेट UPI पेमेंट करता येते. यासह, पेमेंट रक्कम इत्यादी भरण्याची आवश्यकता नाही.