शुक्रवारी, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने एलॉन मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देशात बंदी घालण्यात आली. हा निर्णय देशातील चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, दुसरीकडे मस्क यांनी या निर्णयानंतर न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेस यांना “राजकीयदृष्ट्या प्रेरित” असे म्हटले आहे. “भाषण स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे आणि ब्राझीलमधील एक न निवडलेला न्यायाधीश राजकीय हेतूने त्याचा नाश करत आहे,” असे मस्कने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलने मस्क यांना कंपनीसाठी नवीन कायदेशीर प्रतिनिधी नियुक्त करण्याचा आदेश दिला होता मात्र मास्कने हा आदेश फेटाळून लावला. तसेच एक्सवर यावेळी चुकीची माहिती आणि बनावटी बातम्यापसरवल्या जात होत्या. विशेषतः 2022 मधील ब्राझीलच्या निवडणुकांदरम्यान मोरेसचा असा विश्वास आहे की एक्सचा वापर राजकीय हेतूंसाठी केला जात आहे.
हेदेखील वाचा – इलॉन मस्कसाठी ब्राझीलकडून कडक आदेश, 24 तासांत उत्तर न मिळाल्यास बंद होणार X! काय आहे प्रकरण? जाणून घ्या
या कारणास्तव, गुगल, ऍपल आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरसह मोठ्या टेक कंपन्यांना तांत्रिक बंदी लादण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जे युजर्सना एक्स ऍप्लिकेशन्स आणि वेबसाइट्समध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतील. यामध्ये त्यांच्या स्टोअरमधून एक्स ॲप काढून टाकणे आणि ब्राझिलियन इंटरनेट नेटवर्कवरील वेबसाइट ब्लॉक करणे यासारख्या ऍक्टिव्हिटीजचा समावेश आहे.
Free speech is the bedrock of democracy and an unelected pseudo-judge in Brazil is destroying it for political purposes https://t.co/eqbowALCeu
— Elon Musk (@elonmusk) August 30, 2024
ब्राझीलमध्ये एक्सवर आता बंदी घालण्यात आली असून जर कोणी युजर कायद्याचे पालन न करता एक्सचा वापर करताना आढळेल तर त्याला मोठा दंड आकारावा लागणार आहे. जर कोणी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच VPN द्वारे याचा वापर करत असेल तर त्याला $8,874 म्हणजेच अंदाजे 7 लाख रुपये दंड आकारला जाईल.
हेदेखील वाचा – भारतीयांविरुद्ध Racist पोस्ट करणाऱ्या Barry Stanton’चे एक्स अकाउंट सस्पेंड
माहितीनुसार, ब्राझीलमध्ये एक्सचं 22 दशलक्षाहून अधिक युजर्स आहेत ज्यांना या बंदीचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर इतर सोशल मीडिया कंपन्यांनाही अशाच प्रकारच्या बंदीला सामोरे जावे लागू शकते. या निर्णयाचा ब्राझीलच्या राजकारणावर आणि समाजावर खोलवर परिणाम होऊ शकतो.
काही तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय योग्य आहे कारण एक्सचा वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जात होता. तर काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. मात्र आता ब्राझील सरकारचा हा निर्णय सोशल मीडिया कंपन्या आणि सरकारमधील तणाव आणखीन वाढवणार असे दिसून येत आहे.