एलॉन मस्कच्या एक्स प्लॅटफॉर्मने बॅरी स्टँटनच्या खात्यावर बंदी घातली आहे. बॅरी स्टँटनने त्याच्या एक्स हँडलवर भारतीयांबद्दल वर्णद्वेषी (Racist) पोस्ट केल्या होत्या, ज्यामध्ये अनेक वर्णद्वेषी (Racist) व्यंगचित्रे देखील समाविष्ट होती, या पोस्ट्समध्ये भारतीयांना उघड्यावर शौचास जाताना दाखवण्यात आले होते. पाश्चिमात्य देशांतून भारतीयांना कसे पळवून लावायचे हेही सांगितले. यानंतर या पोस्ट व्हायरल झाल्या आणि त्याचा भारतात निषेध करण्यात आला. त्यांनतर आताएक्सने या अकाउंटवर कारवाई केली आहे.
बॅरी स्टँटनने भारतीयांविरुद्ध वर्णद्वेषी पोस्ट शेअर करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा चुकीचा वापर केला. स्टँटनने भारतीयांविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी 1.8 लाख फॉलोअर्स असलेले अकाउंट वापरले. हे अकाउंट एक्सद्वारे देखील व्हेरिफाय केले गेले. या पोस्ट्सनंतर हजारो वेळा त्याची तक्रार आणि मेल करण्यात आली. त्यानंतर एक्सने अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला.
हेदेखील वाचा – व्हॉट्सॲपची चिंता वाढली, एलॉन मस्कच्या X’ वर आता करता येणार Audio-Video Calls!
काही भारतीय ज्यांनी पूर्वी एक्सवर त्याच्या वर्णद्वेषी पोस्टची तक्रार केली होती त्यांना सोशल मीडिया कंपनीकडून ईमेल प्राप्त झाले होते की युजर्सचे कंटेंट कंपनीच्या सामाजिक धोरणांचे उल्लंघन करत आहे. एक्स मालक इलॉन मस्कवरही भारतीयांकडून सतत दबाव टाकला जात होता. परिणामी, आता अकाउंट बंद करण्यात आले.
हेदेखील वाचा – अंबानींची भेट! Jio सेटअप बॉक्सवर 800 हून अधिक टीव्ही चॅनेल फ्रीमध्ये मिळणार
बॅरी स्टँटनच्या एक्स बायोमध्ये दावा केला आहे की, तो ब्रिटिश नागरिक आहे आणि पाच मुलांचा बाप आहे. तथापि, खात्यावरील ऍक्टिव्हिटीज काही वेगळेच सूचित करत आहे. असे दिसते की बॅरी स्टँटन हे एक बनावटी नाव असून याचा वापर ट्रोलिंगसाठी जात आहे.